Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad IPL 2024: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 


बंगळुरु आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 23 सामने खेळले गेले. यामध्ये हैदराबाचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. हैदराबादने 12 सामन्यात विजय मिळवला आहे, तर आरसीबीचा 10 सामन्यात विजय झाला आहे. सध्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ चौथ्या आणि आरसीबीचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. 


खेळपट्टी कशी असले?


एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असते. या मैदानात नेहमी धावांचा पाऊस पडताना दिसतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या संघांनी सहज विजय मिळवला आहे. 25 मार्च रोजी झालेल्या सामन्यात, बेंगळुरूने लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबविरुद्ध विजय नोंदवला. यानंतर कोलकाताने आरसीबीविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करत 29 मार्च रोजी खेळलेला सामना जिंकला.


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुची संभाव्य Playing XI:


विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल/कॅमरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, रीस टोपले, विजयकुमार विशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज


सनरायझर्स हैदराबादची संभाव्य Playing XI:


ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संपूर्ण संघ


विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, आकाश दीप, सौरव चौहान, सुयश प्रभू , स्वप्नील सिंग, राजन कुमार, कर्ण शर्मा, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत, मनोज भंडागे, यश दयाल, हिमांशू शर्मा


सनरायझर्स हैदराबाद संपूर्ण संघ


ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग, मयंक अग्रवाल


संबंधित बातम्या: 


रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!


सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न


टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान