Matheesha Pathirana in IPL 2022, Chennai Super Kings : आयपीएलमध्ये यंदा चेन्नईच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईने यंदाच्या हंगामात 13 सामन्यात फक्त चार विजय मिळवले आहेत. तर 9 सामन्यात पराभव स्विकारलेत. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चारवेळा आयपीएल चषक उंचावणाऱ्या चेन्नईला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. बेंच स्ट्रेंथ तपासून पाहाण्यासाठी गुजरातविरोधात चेन्नईने रविवारी संघात काही बदल केले. त्यामध्ये श्रीलंकेच्या मथीशा पथिराना याला संधी दिली होती. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मथीशा पथिराना याने पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. पहिल्याच षकटकात शुभमन गिलला बाद करत दणक्यात पदार्पण केले. 


मथीशा पथिरानाला ज्युनिअर मिलिंगा म्हणून ओळखले जाते. दुखापतग्रस्त एडम मिल्नेच्या जागी चेन्नईने मथीशा पथिरानाला आयपीएलच्या अर्ध्यात संघात सामिल केले. 19 वर्षीय मथीशा पथिराना  याला गोलंदाजी अॅक्शनवरुन ज्युनिअर मलिंगा म्हणून ओळखलं जातेय. त्याची गोलंदाजीची अॅक्शन मलिंगासारखी आहे. मथीशा पथिराना  याने पदार्पणाच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. मथीशा पथिरानाने फॉर्मात असणाऱ्या गिलला तंबूत पाठवत आयपीएलमध्ये दणक्यात एन्ट्री केली.गिलने 17 चेंडूत 18 धावा केल्या.  


पदार्पणाच्या सामन्यात मथीशा पथिरानाने भेदक मारा केला.  3.1 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. गिलशिवाय मथीशाने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यालाही तंबूत धाडले.  






ज्युनिअर मलिंगा - 
मथीशा पथिरानाला वेगवान गोलंदाज आहे. लसिथ मलिंगाप्रमाणे गोलंदाजी करत असल्यामुळे मशीथाला ज्युनिअर मलिंगा म्हणून ओळखलं जाते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मथीशाने अंडर 19 मध्ये दमदार प्रदर्शन केलेय. चेन्नईने मथीशाला 20 लाख रुपयांमध्ये साइन केले आहे. मथीशाने आतापर्यंत दोन टी 20 सामने आणि लिस्ट ए चा एक सामना खेळला आहे. अंडर 19 विश्वचषकात मथीशाने पाकिस्तान, वेस्ट विंडिजविरोधात प्रत्येकी दोन दोन बळी घेतले होते.