Jos Buttler Fined 10 Percent of Match Fee for Breaching IPL Code of Conduct : राजस्थान रॉयल्स संघाने ईडन गार्डन्स मैदानवर कोलकात्याचा दारुण पराभव केला. गुरुवारी राजस्थानने कोलकात्याचा पराभव करत प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. पण या सामन्यात असभ्य वर्तवण करणाऱ्या जोस बटलर याला आर्थिक दंड बसला आहे. सामन्यादरम्यान आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जोस बटलर याला सामन्याला मिळणाऱ्या मानधनाच्या दहा टक्के दंड ठोठावण्यात आलाय.



कोलकात्याने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल याने वादळी सुरुवात केली. यशस्वीने पहिल्याच षटकात २६ धावा चोपल्या. पण दुसऱ्या बाजूला असणारा बटलर खातेही न उघडता तंबूत परतला. जोस बटलर धावबाद झाला.. जोस बटलरला खातेही उघडता आले नाही.. यशस्वी जयस्वालसाठी जोस बटलरने विकेट फेकली. जोस बटलरचे योगदान यशस्वीने वाया जाऊ दिले नाही. यशस्वी जयस्वाल याने नाबाद ९८ धावांची खेळी करत राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला. जोस बटलर याने यशस्वीसाठी विकेट फेकली पण बाद झाल्यानंतर निराश होता. जोस बटलर रागात होत... तंबूत परतत असताना सीमारेषावर असणाऱ्या रोपवर त्याने बॅट मारली. असभ्यवर्तन असल्याचे समोर आल्यामुळे बीसीसीआयने जोस बटलर याला दहा टक्के दंड केला..


सामन्यानंतर मध्यरात्री आयपीएल सोशल मीडियाद्वारे जोस बटलर याला दंड ठोठावल्याची  माहिती दिली.  जोस बटलर याने आयपीएल आचार संहिता नियम २.२ चे उल्लंघन केले. मॅच रेफरीसमोर जोस बटलर याने आपली चूक मान्य केली. पहिली चूक असल्यामुले जोस बटलर याला दहा टक्के दंड ठोठावण्यात आलाय.