IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी ट्रेड विंडो सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या आयपीएलची चर्चा सुरु आहे. आयपीएल लिलावाचीही चर्चा सुरु आहे. आयपीएल 2024 साठी मुंबईच्या संघात काही बदल केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला रिलिज केले जाण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबईने जोफ्रा आरच्रला आठ कोटी रुपये खर्च करुन ताफ्यात घेतले होते. पण जोफ्रा अर्चर दोन हंगमात फक्त पाच सामने खेळला. जोफ्रा आर्चरला करारबद्ध करण्यासाठी मुंबई इंडियन्सने भलीमोठी रक्कम खर्च केली होती. पण आर्चरने मुंबईची निराशा केली. मागील दोन वर्षात आर्चरला अनेकदा दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदाच्या हंगमाच्या आधी मुंबई जोफ्रा आर्चरला रिलिज करण्याची शक्यता आहे.
जोफ्रा आर्चरचं आयपीएल करिअर कसे राहिले?
जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 45 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याला 48 विकेट घेता आल्या आहेत. यादरम्यान, जोफ्रा आर्चरचा इकॉनमी 7.43 राहिलाय तर त्याचा स्ट्राइक रेट 19.69 होता. जोफ्रा आर्चरने राजस्थान रॉयल्ससाठी 35 सामने खेळले आहेत, तर त्याने 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. जोफ्रा आर्चर याला आयपीएलमध्ये अद्याप प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्याला विकेट घेण्यातही अपयश आलेय, त्याशिवाय धावाही रोखता आल्या नाहीत.
आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार?
IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल लिलाव भारताऐवजी विदेशात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत आयपीएलचे संघ आपली रिलिज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करु शकते. दरम्यान, नुकताच मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्डला ताफ्यात घेतले आहे. मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सकडून रोमॅरियो शेफर्ला ट्रेड केलेय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त फक्त चेन्नई सुपर किंग्जलाच 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे.