Kavya Maran Viral Video: रविवारी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyederabad) शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव केला. अब्दुल समदने संदीप शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyederabad) विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनरायझर्स हैदराबादची मालकी काव्या मारन या विजयानंतर अतिशय आनंदी झाली. संदीप शर्माच्या शेवटच्या चेंडूवर अब्दुल समदने षटकार ठोकला तेव्हा काव्या मारनच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिची ही रिअ‍ॅक्शन आता चांगलीच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


काव्या मारनचा (Kavya Maran) व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट करून त्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. वास्तविक, सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 6 धावांची गरज होती, मात्र सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अब्दुल समदला संदीप शर्माने बाद केले. मात्र, अब्दुल समद ज्या चेंडूवर आऊट झाला तो नो बॉल होता. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबाद आणि अब्दुल समद यांना आणखी एक संधी मिळाली. त्याचवेळी अब्दुल समदने षटकार ठोकला. यानंतर सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिने आनंदात केलेल्या जल्लोषाची आता एकच चर्चा होत आहे.




कोण आहे काव्या मारन?


काव्या मारन ही सनरायझर्स फ्रँचायझीची सीईओ आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी असून कलानिधी मारन हे प्रसिद्ध सन ग्रुपचे संस्थापक आहेत. कलानिधी हे विविध दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओ स्टेशन, डीटीएच सेवा, वर्तमानपत्रे आणि एका फिल्म प्रोडक्शन हाऊसचेही मालक आहेत. काव्या मारन हिला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असल्याने ती आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या जवळपास सर्व सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित असते. आपल्या संघाला प्रोत्साहन देखील देताना ती दिसून येते. काव्या मारनचे सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ती एक सोशल मीडिया सेन्सेशनही झाली आहे.



प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम


विशेष म्हणजे या सामन्यात राजस्थानने हैदराबादला 215 धावांचे लक्ष्य दिले होते, जे हैदराबादने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पूर्ण केले. आता या विजयासह सनरायझर्स हैदराबाद पुन्हा 8 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आहेत.

हेही वाचा:


IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शुभमन गिलची उडी, विराट कोहली कोणत्या स्थानावर? 19 विकेट घेणाऱ्या शमीकडे पर्पल कॅप