RCB vs SRH: आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) सामना सनरायझर्स हैदराबादशी  (Sunrisers Hyderabad) होणार आहे. हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानं ऑरेंज आर्मी बंगळुरूचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला कोणत्याही किंमतीवर आजचा सामना जिंकावाच लागेल. 


आरसीबीनं मोठा विजय नोंदवला


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी RCB नं 6 सामने जिंकले आहेत, तर तेवढ्याच सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. 12 गुणांसह फॅफ डुप्लेसिसचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.


बंगळुरूनं गेल्या सामन्यात दमदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्सकडून 112 धावांनी पराभव झाला. फलंदाजीमध्ये डुप्लेसिस आणि मॅक्सवेलनं धावांचा डोंगर उभा केला, तर कोहलीनंही संघासाठी दमदार धावांची खेळी केली. मोहम्मद सिराज आणि वेन पार्नेल प्रतिस्पर्धी फलंदाजांना थोपवण्यात यशस्वी ठरले. 


हैदराबाद जिंकल्यास आरसीबी पेचात 


हैदराबाद आयपीएल 2023 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे हैदराबादचं प्लेऑफचं स्वप्न यापूर्वीच भंगलं आहे. अशा परिस्थितीत अॅडम मार्करामच्या नेतृत्वाखाली एसआरएच अंतिम चारमध्ये खेळण्याचं आरसीबीचं स्वप्न भंग करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. या सीझनमध्ये SRH च्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार वगळता बाकीचे गोलंदाजही अडचणीत आले आहेत. 


हैदराबादच्या खेळपट्टीचा अहवाल?


राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंची मोठी भूमिका असते. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात या मैदानावर 367 धावा झाल्या होत्या आणि फक्त 9 विकेट्स पडल्या होत्या.


आकडे काय सांगतात?


राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 69 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 30 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं मैदानात धडक मारली आहे. त्याचबरोबर 39 सामन्यांमध्ये विजयाचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या हातात आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 159 आहे.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


RCB vs SRH: बंगळुरूसमोर हैदराबादचं आव्हान; कशी असेल दोन्ही संघांची Playing 11