IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या सीझनमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीनं 15 धावांनी पंजाबवर मात केली. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. त्यामुळे कालच्या विजयामुळे दिल्लीला तसा काहीच फायदा झालेला नाही. हा मात्र दिल्लीच्या विजयानंतर प्लेऑफची गणितं काही प्रमाणात बदलली आहेत. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर विजयामुळे खूपच खूश आहे. आपल्या संघाच्या खराब कामगिरीवर निराश असल्याचंही तो यावेळी  म्हणाला.


डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, आमचा फिल्डिंग खूपच खराब होती. पण तरी आम्ही आमच्या स्ट्रेंथवर खेळलो. घरात नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. पण, इथे कोणत्याच अडचणी आल्या नाहीत." 


वॉर्नरनं पृथ्वी शॉच्या कामगिरीचं जोरदार कौतुक केलं. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार वॉर्नर म्हणाला की, "पृथ्वी शॉनं चांगली फलंदाजी केली. शॉच्या फलंदाजीचा प्रभाव पाहून आनंद झाला. रिलेनंही अप्रतिम फलंदाजी केली. घरच्या मैदानावर खेळताना आम्हाला सुधारण्याची गरज आहे. आम्ही आमच्या होम ग्राउंडवरील स्कोअरवर काम करू शकलो नाही. पण इथे दोन पॉईंट्स मिळवणं चांगलं होतं." 


दिल्लीकडे अजुनही संधी 


पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयानं दिल्ली कॅपिटल्सनं पॉईंट टेबलमध्ये वरचं स्थान पटकावलं आहे. यापूर्वी हा संघ दहाव्या क्रमांकावर होता. पण आता दिल्ली कॅपिटल्स 10 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. जर दिल्ली कॅपिटल्सनं शेवटचा सामना जिंकला तर त्यांच्याकडे पॉईंट टेबलमध्ये वरचं स्थान मिळवण्याची संधी असेल.


दिल्ली कॅपिटल्सनं पंजाबवर मात करुन विजय मिळवला. खरं तर दिल्ली कधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. पण कालच्या दिल्लीच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत आणखी रंगतदार होणार आहे. पंजाब किंग्सचं प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न आता कदाचित अधुरंच राहू शकतं. त्यासोबतच मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या प्लेऑफच्या आशा वाढल्या आहेत. 


दिल्लीचा पंजाबवर 15 धावांनी विजय


दिल्लीनं पंजाबवर 15 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीनं दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ आठ विकेटच्या मोबद्ल्यात 198 धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकीही झुंज दिली. लियाम लिव्हिंगस्टोन याने 94 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय अथर्व तायडे यानेही संयमी अर्धशतक झळकावले. दिल्लीने पंजाबचा पराभव करत यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. दिल्लीचा संघ 10 गुणावर पोहचलाय. दिल्लीविरोधातील पराभवामुळे पंजाबचे  प्लेऑफचे आव्हान खडतर झालेय. पंजाबचा एक सामना बाकी आहे, त्या सामन्यात जरी विजय मिळवला तरी ते 14 गुणांपर्यंत मजल मारतील. त्यामुळे इतर संघाच्या कामगिरीवर पंजाबचे प्लेऑफचे आव्हान अवलंबून असेल.