IPL 2023 Auction Live: लिलाव संपला, 80 खेळाडूंवर 167 कोटी खर्च; आता प्रतिक्षा आयपीएल सामन्यांची
IPL 2023 Mini Auction: आगामी आयपीएल अर्थात आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामासाठी मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) पार पडणार असून काही महत्त्वाचे बदल यावेळी पाहायला मिळू शकतात.
आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कोची येथे लिलाव पार पडला. तब्बल सहा तास चाललेल्या या लिलावात 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू खेळाडू. सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांना सर्वाधिक बोली लागली. तर अमित मिश्रा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला. या लिलावात 80 खेळाडू मालामाल झाले आहेत.
बांगलादेशचा स्टार खेळाडू लिटन दास याला 50 लाख रुपयांना कोलकाता नाईट रायडर्स संघानं विकत घेतलं आहे.
जोशुवा लिटीलला 4.4 कोटींना गुजरातनं विकत घेतलं असून आयपीएलमध्ये विकत घेण्यात आलेला तो पहिला आयर्लंडचा खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जॅमिसन याला 1 कोटींच्या बेस प्राईसला चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे.
यंदाच्या ऑक्शनमध्ये अष्टपैलू शिवम मावी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला असून त्याला गुजरात टायटन्सने 6 कोटींना विकत घेतलं आहे. तर मुकेश कुमारला दिल्लीने 5.50 कोटींना घेतलं आहे. याशिवाय विव्रत शर्माला 2.60 कोटींना सनरायजर्स हैदराबादने, केएस भरतला 1.20 कोटींना गुजरात टायटन्सने तर एन जगदीशनला 90 लाखांना कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतलं आहे.
मधल्या फळीतील क्लासिक फलंदाज मनिष पांडे आता दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत दिसणार आहे. 2.4 कोटी रुपये खर्च करुन त्याला डीसीने संघात सामिल केलं आहे.
निकोलस पूरनलाही चांगली किंमत यंदाच्या ऑक्शनमध्ये मिळाली असून 16 कोटींना त्याला लखनौ सुपरजायट्ंसने विकत घेतलं आहे.
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान सॅम करन यानं पटकावला असून तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने त्याला विकत घेतलं आहे. तर कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनीही रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन स्टोक्सला 16.25 कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे.
एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या अजिंक्य रहाणेला केवळ 50 लाखांना चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे.
पंजाब किंग्सचा माजी कर्णधार मयांक अगरवाल याला सनरायझर्स हैदराबादने 2.25 कोटींना विकत घेतलं आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट 1 कोटींच्या बेस प्राईसवर लिलावात सामिल झाला होता. पण पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याच संघाने त्याला विकत घेण्यात इंटरेस्ट दाखवला नाही.
इंग्लंडच्या युवा डॅशिंग फलंदाज हॅरी ब्रुकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या छोट्या कारकिर्दीत कमाल कामगिरी केली आहे.अलीकडेच, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्येही त्याने वेगवान पद्धतीनं तीन शतकं झळकावली आहेत. त्यामुळे अनेक संघांना त्यांच्या मधल्या फळीत त्याला विकत घ्यायचं होतं, त्यामुळे तब्बल 13.25 कोटींना सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला विकत घेतलं आहे.
सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार केन विल्यमसन याला गुजरात टायटन्स संघानं 2 कोटींना खरेदी केलं आहे.
आयपीएल 2023 साठी लिलाव सुरू होण्यास काही वेळ शिल्लक आहे. दुपारी 2.30 वाजल्यापासून लिलाव सुरू होईल. या हंगामाच्या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. मात्र, सर्व 10 संघांमध्ये केवळ 87 जागा रिक्त आहेत. लिलावात सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक पैसे असून शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात कमी पैसे आहेत.
आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 2021 मध्ये 16.25 कोटींना खरेदी केले होते. पण यंदा हा विक्रम मोडण्यासाठी चार खेळाडू सज्ज झाले आहेत. हे चार खेळाडू म्हणजे बेन स्टोक्स, सॅम करन, हॅरी ब्रुक आणि कॅमेरुन ग्रीन हे आहेत.
सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज केलं आहे.
पार्श्वभूमी
IPL Mini Auction 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे पार पडणार आहे. या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शॉर्टलिस्ट केली आहे. पण सर्व संघामध्ये मिळून 87 खेळाडूंची जागा शिल्लक असल्यानं 405 पैकी 87 खेळाडूंना संधी मिळणार आहे. दरम्यान या मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या 991 खेळाडूंपैकी 714 भारतीय तर 227 विदेशी खेळाडू होते. ज्यानंतर 991 खेळाडूंपैकी 10 फ्रेंचायझींनी 369 खेळाडूंना ऑक्शनसाठी निवडले. याशिवाय, अन्य 36 खेळाडूंचा ऑक्शनमध्ये समावेश करण्याची विनंती करण्यात आली. अशाप्रकारे आता एकूण 405 खेळाडूंचा मिनी ऑक्शनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 परदेशी खेळाडू आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये 4 खेळाडू असोसिएट देशांचे देखील आहेत. या 405 खेळाडूंपैकी एकूण 119 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. उर्वरित 282 खेळाडू अनकॅप्ड आहेत. या खेळाडूंमध्ये 19 खेळाडू हे स्टार खेळाडू असून त्यांची बेस प्राईस 2 कोटी आहे. हे सर्व खेळाडू परदेशी आहेत. तर 11 खेळाडूंची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय, 20 खेळाडूंची बेस प्राईस एक कोटी देखील आहे. दरम्यान ऑक्शनसाठी खेळाडूंना वेगवेगळ्या गटात ठेवलं जाणार आहे. ब्रेस पाईज आणि खेळाडूंच्या स्कीलच्या आधारावर गट तयार केलं जातं. ज्यात गोलंदाज, स्पिनर्स, ऑलराऊंडर्स, फलंदाज आणि विकेटकिपर यांचा गट तयार केला जातो. याशिवाय, कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंचाही गट तयार केला जातो.
कोणत्या संघाकडं किती रक्कम शिल्लक?
1) सनरायजर्स हैदराबाद
सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज केलं आहे.
2) पंजाब किंग्स
दुसरीकडे पंजाब संघाने एकूण 10 संघाला रिलीज केलं आहे. यानंतर संघाकडे एकूण 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहेत. आता टीमकडे एकूण 7.05 कोटी पर्समध्ये शिल्लक आहेत. हा पैसा त्यांना मिनी लिलावात वापरता येणार आहे.
3) लखनौ सुपरजायंट्स
मागील वर्षी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्सने यावेळी काही खेळाडूंना सोडले असून त्यांची एकूण पर्स व्हॅल्यू 23.35 कोटी इतकी झाली आहे. संघात एकूण 4 विदेशी खेळाडूंचे स्थान शिल्लक आहे.
4) मुंबई इंडियन्स
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबईने अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असणार आहेत.
5) चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई संघाने ख्रिस जॉर्डन आणि अॅडम मिल्नेसारखे खेळाडू सोडले आहेत. आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे. त्याच वेळी, संघाकडे एकूण 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.
6) दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला केकेआरला ट्रेड केलं आहे. ज्यानंतर त्यांच्याकडे 19.45 कोटी इतके रुपये शिल्लक आहेत. तर 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.
7) गुजरात टायटन्स
आयपीएल 2022 जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सने लॉकी फर्ग्यूसन आणि रहमनुल्ला गुरबाज यांना ट्रेड केलं आहे. ज्यानंतर टीमकडे एकूण 19.25 कोटी रुपए शिल्लक आहेत. तर 3 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.
8) राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघाकडे खेळाडूंना रिलीज केल्यावर 13.20 कोटी इतकी पर्स वॅल्यू असून 4 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.
9) रॉयल चँलेंजर्स बंगळुरु
रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडे 8.75 कोटी रुपये शिल्लक असून 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.
10) कोलकाता नाईट रायडर्स
केकेआरने लॉकी फोर्ग्युसन, शार्दुल ठाकूर आणि रहमानउल्ला गुरबाज यांचा ट्रेडद्वारे संघात समावेश केला आहे. यानंतर, संघाकडे 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत, जे सर्व संघांमध्ये सर्वात कमी आहे. त्याचबरोबर संघात 3 विदेशी खेळाडूंचे स्लॉटही उपलब्ध आहेत.
हे देखील वाचा-
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -