Priyansh Arya IPL Mega Auction जेद्दाह : 2025 च्या आयपीएलसाठी सुरु असलेलं मेगा ऑक्शन संपलं आहे. ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडूंना चांगली रक्कम मिळाली आहे. या खेळाडूंमध्ये प्रियांश आर्या या नावाचा समावेश आहे. प्रियांश आर्यानं दिल्ली टी 20 प्रीमियर लीगमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते, त्यामुळं चर्चेत आला होता. प्रियांश आर्याचं नाव मेगा ऑक्शनमध्ये 30 लाख रुपये मूळ किंमत असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत होतं.
दिल्ली कॅपिटल्सनं सुरुवातीला पहिली बोली प्रियांश आर्याच्या नावासाठी लावली. दिल्लीला त्यांच्या संघात एक स्थानिक खेळाडू हवा होता. दिल्लीसोबत मुंबई इंडियन्सनं प्रियांश आर्यासाठी बोली लावली. त्यानंतर पंजाब किंग्जनं देखील बोली लावली.
प्रियांश आर्याच्या नावावर बोली लावण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा लावली. 30 लाख रुपयांची बोली एक कोटींचा आकडा पार करुन पुढं गेली. यानंतर आरसीबीनं प्रियांश आर्यासाठी बोली लावली. आरसीबीनं प्रियांशसाठी 1.4 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. पंजाब किंग्जनं 1.5 कोटी रुपयांची बोली लावली. यानंतरही प्रियांश आर्याला संघात घेण्यासाठी संघांमध्ये स्पर्धा सुरु होती.
लिलाव सुरु असताना एकदा स्थिती अशी आली की आरसीबी प्रियांश आर्याला आपल्या संघात घेणार, मात्र त्याचवेळी पंजाब किंग्जनं पुन्हा बोली लावली. प्रियांश आर्याला 3 कोटी 80 लाख रुपयांना पंजाब किंग्जनं खरेदी करुन संघात स्थान दिलं.
प्रियांश आर्यानं काही दिवसांपूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक केलं होतं. दिल्ली आणि पंजाब दरम्यानच्या मॅचमध्ये 43 बॉलमध्ये 102 धावांची खेळी केली. उत्तर प्रदेशच्या संघात भुवनेश्वर कुमार, शिवम वामी आणि पीयूष चावला या सारखे दिग्गज खेळाडू होते. मात्र, तरी देखील प्रियांश आर्यानं आक्रकम फलंदाजी कायम ठेवली होती. प्रियांश आर्यानं वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचा देखील चांगला सामना केला होता. आर अश्विननं त्याच्या यूट्यूब शोमध्ये प्रियांश आर्याचं कौतुक केलं होतं.
आयपीएलचं मेगा ऑक्शन संपलं
जेद्दाहमध्ये दोन दिवसांपासून सुरु असलेलं मेगा ऑक्शन संपलं आहे. टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू यष्टीरक्षक रिषभ पंतला 27 कोटी रुपये खर्च करुन लखनौ सुपर जाएंटसनं संघात स्थान दिलं. तर, दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला 2024 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपये खर्च करुन संघात स्थान दिलं होतं. यानंतर पंजाबनं अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल या दोघांना देखील प्रत्येकी 18 कोटी रुपये खर्च करुन संघात स्थान दिलं आहे.
इतर बातम्या :