Virat Kohli : विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? रवि शास्त्री कोहलीसोबत झालेली चर्चा सांगत म्हणाले...

Ravi Shastri on Virat Kohli : रवि शास्त्री यांनी विराट कोहलीच्या निवृत्तीवर भाष्य केलं आहे. विराटनं निवृत्तीपूर्वी चर्चा केली होती असं ते म्हणाले.

विराट कोहली

1/6
विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबत भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी मोठा खुलासा केला आहे. विराट कोहलीनं निवृत्ती घेण्या अगोदर चर्चा केली होती असं ते म्हणाले. रवि शास्त्रींनी आयसीसी रिव्यूमध्ये संजना गणेशनसोबबत चर्चा केली.
2/6
रवि शास्त्री संजना गणेशन सोबत बोलताना म्हणाले की, विराट कोहलीनं निवृत्ती घेण्यापूर्वी सात दिवस अगोदर चर्चा केली होती. विराटकडे त्याच्या निर्णयाबाबत स्पष्टता होती. कसोटी क्रिकेटसाठी जे शक्य होतं ते सर्व केलंय अशी विराटची भावना होती.
3/6
विराट कोहली भारतीय क्रिकेट टीमचा कसोटीमधील सर्वोत्कृष्ट कॅप्टन आहे. त्यानं 68 मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं त्यापैकी 40 सामन्यात संघाला विजय मिळाला होता. यानंतर दुसऱ्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी आहे.
4/6
रवि शास्त्री विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत म्हणाले, त्यानं सांगितलं की, मला पश्चाताप होत नाही. शास्त्री पुढे म्हणाले त्याला एक दोन खासगी प्रश्न विचारले, त्यावर त्यानं स्पष्ट म्हटलं की माझ्या मनात कोणताही संशय नाही. शास्त्री म्हणाले की मला वाटतं हा योग्य वेळ होता. विराट कोहलीच्या मनानं त्याच्या शरीराला वाटलं की आता इथून जाण्याची योग्य वेळ आहे.
5/6
रवि शास्त्री पुढं म्हणाले की, विराट कोहलीनं जर एखादी गोष्ट ठरवली तर तो त्यासाठी 100 टक्के योगदान देतो. ज्याची बरोबरी करणं कोणत्याही फलंदाज किंवा गोलंदाजाला करता येणार नाही.
6/6
शास्त्री पुढं म्हणाले खेळाडू मॅचमध्ये त्यांचं काम करतात आणि त्यानंतर आराम करतात मात्र विराट कोहली जेव्हा संघासह मैदानात येतो तेव्हा त्याला वाटतं की त्यानं सर्व विकेट घ्याव्यात, सर्व कॅच घ्यावेत. मैदानावरील निर्णय घ्यावेत.
Sponsored Links by Taboola