Rohit Sharma captaincy : प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) पंजाब किंग्स (PBKS) संघाला मागील 16 वर्षांमध्ये एकदाची चषक उंचावता आला नाही. यंदाच्या हंगामातही पंजाबची कामगिरी साधारणच राहिली आहे. शिखर धवनच्या पंजाबला सहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आले आहेत, तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत पंजाबचा (PBKS) संघ तळाला आठव्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सविरोधात पंजाबला तीन विकेटनं निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना प्रिती झिंटानं (Preity Zinta) रोहित शर्माबद्दल केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंजाब किंग्सची मालकीन प्रिती झिंटा म्हणाली की, पंजाब किंग्ससाठी स्थिर आणि चॅम्पियन कर्णधाराची गरज आहे. सहकारी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यात कर्णधाराचा मोठा रोल असतो. त्याशिवाय प्रिती झिंटा हिने रोहित शर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Rohit Sharma ला IPL 2025 लिलावात खरेदी करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास Preity Zinta तयार -
पंजाब किंग्सची मालकीन आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) म्हणाली की, पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा माजी कर्णदार रोहित शर्माकडे प्रत्येक टॅलेंट आणि क्षमता आहे, ज्याचा शोध पंजाबचा संघ घेत आहे. आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्माला विकत घेण्यासाठी मी माझा जीवही धोक्यात घालू शकते. जर रोहित शर्मा कधी मेगा लिलावात उपलब्ध असेल तर प्रिती झिंटाला नक्कीच खरेदी करायचे आहे. प्रिती झिंटाने स्टार स्पोर्टसोबत बोलताना हा खुलासा केला.
रोहित शर्मा मेगा लिलावात आल्यास त्याला खरेदी करण्यासाठी मी सर्वस्वी प्रयत्न करेल, त्यासाठी जीवही द्यायला तयार आहे. आमच्या संघात फक्त एका कर्णधाराची उणीव आहे जो काही स्थिरता आणि चॅम्पियन मानसिकता आणू शकतो, असे प्रिती झिंटा म्हणाली.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई पाच वेळा चॅम्पियन -
2013 मध्ये रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सची धुरा सोपवण्यात आली. त्याच हंगामात रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला चॅम्पियन केले. रोहित शर्माने 10 वर्षांमध्ये मुंबईला पाच वेळा आयपीएल जेतेपद मिळवून दिले. आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये रोहित शर्माचं नाव घेतलं जातं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये चषक उंचावला. आयपीएल 2024 हंगामाआधी मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन बाजूला केले. सध्या मुंबीची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. हार्दिकला कर्णधारपद दिल्यानंतर चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्याशिवाय रोहित शर्मा 2025 मध्ये मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. लखनौ, चेन्नई, दिल्लीसह पंजाब या संघापैकी एका संघामध्ये रोहित शर्मा जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. अनेक दिग्गजांनी रोहित शर्माने मुंबईची साथ सोडून आपला मार्ग बदलावा असा सल्ला दिला आहे.