IPL 2022 Final: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात आज आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याबाबत अनेक दिग्गज आपलं मत मांडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर चैन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैनानं (Suresh Raina) कोणता संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकणार? याचा अंदाज व्यक्त केला आहे. 


क्वालिफायर 1 मध्ये गुजरातची दिसली जादू
दरम्यान, गुजरात टायटन्सनं सर्वात प्रथम प्लेऑमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनं पहिला क्वालिफायर सामना गमावल्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत कोणता संघ जेतेपदावर कब्जा करू करेल? हे येत्या काही तासातंचं स्पष्ट होईल. 


सुरेश रैना काय म्हणाला?
स्टार स्पोर्टशी बोलताना सुरेश रैना म्हणाला की, "आजच्या सामन्यात गुजरातच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. कारण, अंतिम सामन्यापूर्वी गुजरातच्या संघाला चार- पाच दिवसांची विश्रांती मिळाली आहे. तसेच त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण हंगामात कामगिरी करून दाखवली आहे. यामुळं निकाल गुजरातच्या बाजूनं लागण्याची शक्यता आहे. याचबरोबर राजस्थान रॉयल्सला हलक्यात घेता येणार नाही. राजस्थानचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आजच्या सामन्यात जोस बटलरची बॅटीतून धावा आल्या तर, त्या संघासाठी बोनस पॉईंट ठरतील. अहमदाबादची विकेटही चांगली आहे, हा एक रोमांचक सामना ठरण्याची शक्यता आहे", असंही सुरेश रैनानं म्हटलं आहे.  


हे देखील वाचा-