IPL Final Results: Full list of winners, runners-up, Man of the Match, MVP awards since 2008 : धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स थोड्याच वेळात मैदानात आमने सामने असतील.  यंदाच्या मोसमात दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकतील. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा आयपीएल सामना ठरण्याची शक्यता आहे..त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा निकराने प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय. आयपीएलच्या गत मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं..यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहिल. पण यंदा गुजरातसमोर चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईचं तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. पण आतापर्यंतच्या 15 हंगामात कोण कोण विजेते झाले.... उपविजेतेपद कुणाला मिळाले.. सामनावीर पुस्काराचा मानकरी कोण होता. Most Valuable Player कोण होता... याबाबतची माहिती एका क्लिकवर

IPL winners, runner-up, Man of the Match and Man of the Tournament (MVP) award list

Yearविजेताउप विजेता सामन्याचा निकाल काय ?सामनावीर पुरस्कारMost Valuable Player
2008राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपरकिंग्सRR won by 3 wicketsयुसूफ पठाण (RR) - 56 (39), 3/22शेन वॉटसन (RR)
2009डेक्कन चार्जसआरसीबीDeccan won by 6 runsअनिल कुंबळे (RCB) - 4/16अॅडम गिलख्रिस्ट (Deccan)
2010चेन्नई सुपरकिंग्समुंबई इंडियन्सCSK won by 22 runsसुरेश रैना (CSK) - 57* (35), 1/21सचिन तेंडुलकर (MI)
2011चेन्नई सुपरकिंग्सआरसीबीCSK won by 58 runsमुरली विजय (CSK) - 95 (52)ख्रिस गेल (RCB)
2012केकेआरचेन्नई सुपरकिंग्सKKR won by 5 wicketsमनविंदर बिस्ला (KKR) - 89 (48)सुनील नारायण (KKR)
2013मुंबई इंडियन्सचेन्नई सुपरकिंग्सMI won by 23 runsकायरन पोलार्ड (MI) - 60* (32)शेन वॉटसन (CSK)
2014केकेआरपंजाब किंग्सKKR won by 3 wicketsमनिष पांडे (KKR) - 94 (50)ग्लेन मॅक्सवेल (PBKS)
2015मुंबई इंडियन्सचेन्नई सुपरकिंग्सMI won by 41 runs रोहित शर्मा (MI) - 50 (26)आंद्रे रसेल (KKR)
2016सनरायजर्स हैदराबादआरसीबीSRH won by 8 runsवेन कटिंग (SRH) - 39* (15) विराट कोहली (RCB)
2017मुंबई इंडियन्सरायझिंग पुणे सुपरजायंट्सMI won by 1 runकृणाल पांड्या (MI) - 47 (38)बेन स्टोक्स (RPS)
2018चेन्नई सुपरकिंग्ससनरायजर्स हैदराबादCSK won by 8 wicketsशेन वॉटसन (CSK) - 117* (57)सुनील नारायण (KKR)
2019मुंबई इंडियन्सचेन्नई सुपरकिंग्सMI won by 1 runजसप्रीत बुमराह (MI) - 2/14आंद्रे रसेल (KKR)
2020मुंबई इंडियन्समुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्सMI won by 5 wickets

ट्रेंट बोल्ट (MI) - 3/30

जोफ्रा आर्चर (RR)
2021चेन्नई सुपरकिंग्सकेकेआरCSK won by 27 runsफाफ डु प्लेसिस (CSK) - 86 (59)हर्षल पटेल (RCB)
2022गुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्सGT won by 7 wicketsहार्दिक पांड्या (GT) - 34 (30), 3/17जोस बटलर (RR)
2023*TBDTBDचेन्नई सुपरकिंग्स vs गुजरात टायटन्सTBDTBD