5 players with the most runs in IPL finals : अहमदाबादमध्ये आज गुजरात आणि चेन्नई यांच्यात फायनलचा थरार रंगणार आहे. तब्बल दोन महिन्यापासून आठ संघामध्ये चषकासाठी लढत सुरु होती. आज चेन्नई आणि गुजरात या दोन फौजा मैदानात उतरणार आहेत. आजच्या महत्वाच्या सामन्यात सर्वाधिक धावा कोण करणार... याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, डेवेन कॉनवे यांच्यासह हार्दिक पांड्या आणि शिवब दुबे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. आजच्या सामन्यात सर्वाधिक धावा कोण काढणार, याचे उत्तर काही तासात मिळेल. पण आतापर्यंत 15 वर्षात आयपीएलच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा कुणी चोपल्यात.? माहितेय का? आघाडीच्या पाच फलंदाजांबद्दल जाणून घेऊयात... 


आयपीएलच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात आघाडीवर चेन्नईच्या सुरेश रैनाचे नाव आहे. सुरेश रैनाने आयपीएलच्या इतिहासात आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. सुरेश रैना याने आठ आयपीएलमध्ये 36 च्या सरासरीने आणि 150 च्या स्ट्राईक रेटने 249 धावा काढल्या आहेत. यादरम्यान रैनाची सर्वोच्च धावसंख्या 73 इतकी राहिली आहे. तर सुरेश रैना याने आयपीएल फायनलमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत. 


दुसऱ्या क्रमांकावर शेन वॉटसन याचा क्रमांक लागतो. शेन वॉटसन याने 4 डावात 236 धावा काढल्या आहेत. वॉटसन याने 164 च्या स्ट्राईक रेटने आणि 79 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. शेट वॉटसन याने फायनलमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 117 इतकी आहे.  


मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा यानेसहा डावात 183 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 130 इतका राहिलाय... यादरम्यान रोहित शर्मा याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. 


चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चेन्नईचे खेळाडू आहे. मुरली विजय 181 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर 180 धावांसह धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. मुरली विजय याने  चार सामन्यात 181 धावा केल्या आहेत. एमएस धोनी याने आठ सामन्यात 180 धावा काढल्या आहेत. धोनीसोबत पाचव्या क्रमांकावर मुंबईचा कायरन पोलार्ड आहे. पोलार्डनेही आयपीएलच्या फायनलमध्ये 180 धावा केल्या आहेत. आज धोनी फलंदाजीस उतरला तर हा विक्रम मोडीत जाऊ शकतो.


आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण?


आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण? धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे.. यंदाच्या मोसमात दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकतील. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा आयपीएल सामना ठरण्याची शक्यता आहे..त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा निकरानं प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय. आयपीएलच्या गत मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं..यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहिल. पण यंदा गुजरातसमोर चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईचं तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.