Ishan Kishan IPL Auction 2025 : आयपीएल 2025 संदर्भात सध्या सुरू असलेल्या मेगा लिलावात उत्साह वाढत आहे. लिलाव नुकताच सुरू झाला असून लिलावाच्या टेबलावर खेळाडूंवरून फ्रँचायझीमध्ये चांगलीच लढत रंगत आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे, तो गेल्या वर्षीपर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता.
2024 पर्यंत इशान किशन मुंबई इंडियन्सकडून IPL खेळताना दिसला होता. मात्र यावेळी मुंबई संघाने त्याला सोडण्याचा निर्णय घेत मेगा ऑक्शनमध्ये उतरवले आहे. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्स संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी करत होता. यावेळी पंजाब आणि दिल्ली यांच्यात मेगा लिलावात त्यांच्यासाठी चुरशीची लढत पाहिला मिळाली.
इशान किशन कोणत्या संघात गेला?
यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनची बोली 2 कोटी रुपयांपासून सुरू झाली आणि दिल्ली आणि पंजाबला सुरुवातीपासूनच त्याच्याबद्दल उत्सुकता होती. दोन्ही फ्रँचायझी त्याच्यासाठी बराच काळ लढताना दिसल्या पण शेवटी हैदराबादने एंट्री केली आणि 11.25 कोटी रुपयांमध्ये इशान किशनला आपल्या संघात समाविष्ट केले. त्यांच्याकडे आधीच हेन्रिक क्लासेनच्या रूपाने यष्टिरक्षक आहे, त्यामुळे इशान हैदराबादकडून सलामीचा फलंदाज म्हणून खेळताना दिसेल.
इशान किशनची आयपीएल कारकीर्द
इशान किशनने 2016 मध्ये गुजरात लाइन्समधून आयपीएलमधील करिअरची सुरुवात केली होती. गुजरात लाइन्सकडून दोन वर्षे खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सने 2018 मध्ये त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. तेव्हापासून तो सतत या फ्रँचायझीशी जोडला गेला आहे. 2020/21 हंगामात त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. त्या वर्षी त्याने 13 डावात 516 धावा केल्या ज्यात त्याची सरासरी 57.33 होती. जर आपण त्याच्या एकूण कामगिरीबद्दल बोललो तर त्याने खेळलेल्या 99 डावांमध्ये 2644 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने 16 अर्धशतकेही केली आहेत.