IPL Auction Live Streaming & Venue : आयपीएलचा लिलाव उद्या, म्हणजेच 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर लिलाव पार पडणार आहे. यंदाचा आयपीएल लिलाव दुबई येथे होणार आहे. 333 खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. यामध्ये फक्त 77 खेळाडूंचं नशीब बदलणार आहे. लिलावात अनेक मोठ्या नावावर बोली लागण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रचिन रविंद्र आणि अजमतुल्लाह उमरजई यांच्यासारख्या युवा खेळाडूही संघाच्या निशाण्यावर असतील. भारतातील काही अनकॅप खेळाडूवरही पैशांचा पाऊस पडू शकतो.  यापूर्वी, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन 2023 च्या आयपीएलसाठी सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला पंजाब किंग्जने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता या वेळी कोणत्या खेळाडूला सर्वात महागडी बोली लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


आयपीएल लिलाव लाईव्ह कुठे पाहाल ?


दुबईत होणारा आयपीएल लिलाव चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकतात. पण हॉटस्टारवर लिलाव पाहता येणार नाही. चाहत्यांना जिओ सिनेमा अॅपवर लिलावचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकतात. त्याशिवाय जिओ सिनेमाच्या संकेतस्थळावरही लाईव्ह पाहू शकतात. भारतीय वेळेनुसार, लिलाव दुपारी एक वाजता सुरु होणार आहे. 


कुठे पार पडणार लिलाव ?


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील  कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलेय.  


कोणत्या संघाकडे किती पैसे-


RCB - 23.25 कोटी
SRH - 34 कोटी
KKR - 32.7 कोटी
CSK - 31.4 कोटी
PBKS - 29.1 कोटी
DC - 28.95 कोटी
MI - 17.75 कोटी
RR - 14.5 कोटी
LSG - 13.9 कोटी 
GT - 38.15 कोटी



आरसीबीच्या पर्समध्ये 23.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीने 11 खेळाडू रिलिज केले तर कॅमरुन ग्रीनला ट्रेड केले. जोश हेजलवुड, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांना आरसीबीने रिलिज केले.  सनराइजर्स हैदराबाद संघाकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकात्याकडे 32.7 कोटी शिल्लक आहेत. चेन्नई, पंजाब, दिल्ली आणि मुंबईच्या संघाकडे अनुक्रम 31.4 कोटी, 29.1 कोटी, 28.95 कोटी आणि 17.75 कोटी शिल्लक आहेत. त्याशिवाय राजस्थानकडे 14.5 कोटी शिल्लक आहेत. 


लिलावात बोली लागणारे महत्वाचे खेळाडू - 


हॅरी ब्रूक, ट्रेविस हेड, करुण नायर, मनिष पांडे, पॉवेल, रुसो, स्टिव्ह स्मिथ, कोइटजे, पॅट कमिन्स, वानंदु हसरंगा, डॅरेल मिचेल, ओमरजाई, हर्षल पटेल, रचिन रविंद्र, शार्दूल ठाकूर, ख्रिस वोक्स, लॉकी फर्गुसन, जोश हेजलवूड, जोसेफ अल्जारी, मधुशंका, शिवम मावी, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, जयदेव उनादकट, उमेश यादव