IPL Mega Auction 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) हंगामाचा मेगा लिलाव सुरू झाला आहे. लिलावाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) भवितव्याचा निकाल लागला आहे. कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 7 कोटी 25 लाखांची बोली लावून विकत घेतले. आफ्रिकन गोलंदाज कागिसो रबाडासाठी (Kagiso Rabada) अनेक संघांनी बोली लावली आणि शेवटी पंजाब किंग्सने (PBKS) या वेगवान गोलंदाजाला 9.25 कोटी रुपयांना विकत घेतले. या दोन्ही खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, जी बोलीमध्ये खूप महाग विकली गेली.


शिखर धवन आणि अश्विनला मिळाली 'ही' रक्कम


आयपीएलच्याा 15व्या हंगामासाठी लिलाव सुरू झाला आहे. मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी पहिली बोली भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची (Shikhar Dhawan) लागली. त्याला पंजाब किंग्सने (Punjab Kings) 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) ऑफस्पिनर आर अश्विनला (Ravichandran Ashwin) पाच कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2021 मध्ये धवन दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा भाग होता. पण यावेळी तो पंजाब किंग्जशी जोडला गेला आहे. पंजाबही धवनकडे कर्णधारपद सोपवू शकतो, असे मानले जात आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सने वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसाठी मोठी बोली लावली. राजस्थानने 2 कोटी बेस प्राईस असलेल्या या खेळाडूला पाच कोटी रुपयांमध्ये संघात समाविष्ट केले.


श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस, शमीचे नशीबही चमकले


भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर भलताच महाग खेळाडू ठरला आहे. श्रेयसला तब्बल 12.25 कोटींची बोली लावत कोलकात्यानं खरेदी केली आहे. जबरदस्त फार्मात असलेल्या श्रेयसला चांगली बोली लागणार असल्याचा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्याप्रमाणं श्रेयसला कोलकाता संघानं आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम देत खरेदी केलं आहे. 


आतापर्यंत खेळाडूंना लागलेली बोली


श्रेयस अय्यर - 12.25 कोटी (कोलकाता)


शिखर धवन - 8.25 कोटी (पंजाब किंग्स)


आर अश्विन - 5 कोटी (राजस्थान)


ट्रेण्ट बोल्ट - आठ कोटी (राजस्थान)


कगिसो रबाडा - 9.25 कोटी (पंजाब)


पॅट कमिंस - 7.25 कोटी (कोलकाता)


मोहम्मद शामी - 6.25 कोटी (गुजरात)


फाफ डू प्लेसीस - 7 कोटी (बंगळुरु)


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha