IPL 2022 Auction, Day 2 LIVE: आयपीएल मेगा ऑक्शनचा आज दुसरा दिवस, पाहा प्रत्येक अपडेट्स
IPL 2022 Acution : 2022 च्या आयपीएल (IPL) रणसंग्रामासाठीची लिलाव प्रक्रिया आज पार पडतेय. प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा...
महालिलाव अखेर संपला असून मुंबई इंडियन्सने 15.25 कोटींना खरेदी केलेला ईशान किशन यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.ी
अफगानिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी केकेआरमध्ये सामिल झाला आहे. 1 कोटींना त्याला खरेदी केलं आहे.
अरुणय सिंग हा वेगवान लिलाव फेरीतील शेवटचा खेळाडू होता. त्याला राजस्थान रॉयल्सने २० लाखांना विकत घेतले.
पंजाब किंग्सने अंश पटेलला 20 लाखांना खरेदी केले.
अशोक शर्मा 55 लाखांना विकले. केकेआरने त्याचा आपल्या संघात समावेश केला.
आशुतोष शर्मा विकले नाहीत.
पंजाब किंग्सने बलतेज धांडाला 20 लाखांमध्ये खरेदी केले. बलतेज सिंग हा पंजाबकडून खेळतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ट्वेंटी 20 पदार्पण केले.
सौरभ दुबेला सनरायझर्स हैदराबादने २० लाखांमध्ये घेतले. ललित यादव विकले नाहीत.
मुंबईने मोहम्मद अर्शदला 20 लाखांना विकत घेतले.
शशांक सिंगला सनरायझर्सने २० लाखांना विकत घेतले.
अष्टपैलू काईल मेयर्सला लखनौने ५० लाखांत घेतले.
अमित अलीला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही.
अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू करण शर्माला लखनौ फ्रँचायझीने 20 लाख रुपयांना त्याच्या संघात सामील केले.
केकेआरने प्रथम सिंगला 20 लाखांत खरेदी केले.
हृतिक चॅटर्जी पंजाबमध्ये दाखल झाला. त्याला पंजाबने 20 लाखांना विकत घेतले.
निनाथ राथ्वा यांना कोणीही खरेदीदार सापडला नाही. ऋतिक शौकीनही विकला गेला नाही.
अभिजित तोमरला कोलकाता फ्रँचायझीने 40 लाखांना विकत घेतले.
गुजरात टायटन्सने प्रदीप सांगवानला 20 लाखांत घेतले.
कौशल तांबे यांनी विक्री केली नाही. मुकेश कुमार सिंग यांनाही खरेदीदार मिळाला नाही.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. आशीर्वाद मुजरबानीही विकला गेला नाही. आर समर्थला सनरायझर्सने २० लाखांना विकत घेतले.
केकेआरने चमिका करुणारत्नेला 50 लाखांमध्ये खरेदी केले.
केन्नर लुईस, बीआर शरथ, शशांक मिश्रा यांची विक्री झाली नाही.
बाबा इंद्रजीतला केकेआरने 20 लाखांना विकत घेतले.
अष्टपैलू डेव्हिड व्हिसालाही खरेदीदार मिळालेला नाही.
बेनी हॉवेल, हेडन कार, सौरभ कुमार, शम्स मुलाणी, ध्रुव पटेल, अतित शेठ यांची विक्री झाली नाही.
अनकॅप्ड अष्टपैलू अनिश्वर गौतमला आरसीबीने विकत घेतले. त्याला 20 लाख मिळाले.
लखनऊने आयुष बडोनीला 20 लाखांना विकत घेतले.
राहुल बुद्धी आणि लॉरी इव्हान्स अनकॅप्ड फलंदाजांच्या श्रेणीत विकले गेले नाहीत.
मुंबईने रिले मेरेडिथला 1 कोटींना विकत घेतले. केन रिचर्डसनलाही खरेदीदार सापडला नाही.
धवल कुलकर्णी यांना कोणीही बोली लावली नाही...
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफसाठी गुजरात आणि पंजाब फ्रँचायझींमध्ये स्पर्धा होती. गुजरातने त्यांना 2.40 कोटींना खरेदी केले.
अल्झारी शाहीम जोसेफ हा अँटिग्वाचा क्रिकेटपटू आहे जो वेस्ट इंडिजकडून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतो.
शॉन अॅबॉट या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसाठी पंजाब, हैदराबाद फ्रँचायझींमध्ये दीर्घ बोली लागली होती. अॅबॉटला सनरायझर्सने 2.40 कोटींना खरेदी केले.
भानुका राजपक्षे, रोस्टन चेस, बेन कटिंग, पवन नेगी यांच्यासाठी कोणीही बोली लावली नाही.
IPL Mega Auction 2022: जर्सी क्रमांक 259 मार्टिन जेम्स, गप्टिल हा न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. मार्टिन गुप्टिलला लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. जो खेळाच्या मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून खेळतो.
अनकॅप्ड गोलंदाज मिधुल सुदेशला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. वेगवान फेरीत 5 मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला आहे.
राजस्थान आणि चेन्नईने अनकॅप्ड खेळाडू प्रशांत सोलंकीसाठी मोठी स्पर्धा लावली. त्याला चेन्नईने 1.20 कोटींना विकत घेतले. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी, सामन्यात पाच बळी घेतले.
वेगवान फेरीत मयंक यादव, तेजस बरोका, युवराज चुडासामा या अनकॅप्ड खेळाडूंना कोणीही खरेदीदार मिळालेला नाही.
चेन्नईने मुकेश चौधरीला 20 लाखांत विकत घेतले. केकेआरने रसिक दारला 20 लाखांत घेतले. बेन द्वारश्विस आणि पंकज जसवाल यांना कोणीही खरेदीदार सापडला नाही.
लखनऊने मोहसीन खानला 20 लाखांना विकत घेतले. चामा मिलिंग 25 लाखांत आरसीबीने विकत घेतले.
20 लाखाचे झाले 2 कोटी, 10 पट वाढली किंमत. वैभव अरोरा यांना जोरदार किंमत मिळाली, हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा याच्यावर अनकॅप्ड बॉलर प्रकारात जोरदार बोली लागली. त्याला पंजाबने 2 कोटींना विकत घेतले.
अनकॅप्ड यष्टिरक्षक ध्रुव जुरेल आणि आर्यन जुयाल यांना खरेदीदार मिळाले नाहीत.
पंजाब किंग्सने प्रेरक मांकडला 20 लाखांना विकत घेतले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सुयश प्रभुदेसाईला ३० लाखांत घेतले.
रमणदीप सिंग, बी साई सुदर्शन, अथर्व तायडे आणि प्रशांत चोप्रा यांची विक्री झाली नाही.
अनकॅप्ड खेळाडू प्रवीण दुबेला दिल्ली कॅपिटल्सने ५० लाखांना विकत घेतले.
टीम डेव्हिड ६ फूट ५ इंच आहे. यापूर्वी आयपीएल खेळला आहे. सिंगापूरच्या या खेळाडूसाठी बराच वेळ बोली लागली होती. शेवटी, मुंबईने त्याला 8.25 कोटींना विकत घेतले.
अनकॅप्ड फलंदाज वेगवान फेरीत अनकॅप्ड फलंदाजांच्या या श्रेणीत अपूर्व वानखेडे, अथर्व अकोलेकर यांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
अनकॅप्ड फलंदाजांच्या या श्रेणीत अपूर्व वानखेडे, अथर्व अंकोलेकर यांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही
तन्मय अग्रवाल, टॉम कोलर-कॅडमोर, समीर रिझवी यांना अनकॅप्ड फलंदाजांच्या श्रेणीत कोणतेही खरेदीदार मिळाले नाहीत. शुभ्रांश सेनापतीला चेन्नईने २० लाखांना विकत घेतले.
वेगवान गोलंदाजांच्या श्रेणीत, रीस टोपली, अँड्र्यू टाय आणि संदीप वॉरियर यांना खरेदीदार मिळाले नाहीत.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेला चेन्नईने विकत घेतले. मिलने यांना 1.90 कोटी मिळाले.
मुंबईने ब्रिटिश क्रिकेटर टायमल मिल्सला दीड कोटींना विकत घेतले.
राजस्थान रॉयल्सने ओबेद मॅकॉयला 75 लाख रुपयांना खरेदी केले.
नॅथन एलिस, फैजलहक फारुकी आणि सिद्धार्थ कौल यांना खरेदीदार मिळाले नाहीत.
ग्लेन फिलिप्स विकले नाहीत. आरसीबीने जेसन बेहरेनडॉर्फला ७५ लाखांना खरेदी केले.
TATA IPL Auction 2022: रहमानउल्ला गुरबाज आणि बेन मॅकडरमॉट यांना खरेदीदार मिळाले नाहीत.
वेस्ट इंडिजच्या या 27 वर्षीय अष्टपैलू खेळाडूसाठी लखनौ, चेन्नई, हैदराबाद, राजस्थान आणि मुंबई यांच्यात मोठी बोली लागली होती. सनरायझर्सने त्यांना 7.75 कोटींना खरेदी केले.
न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनरला चेन्नईने 1.90 कोटींना विकत घेतले.
डॅनियल सॅम्स ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक फलंदाजाला मुंबई इंडियन्सने 2.60 कोटींना विकत घेतले.
शेरफेन रदरफोर्ड आरसीबीने शेरफेन रदरफोर्डला 1 कोटींना खरेदी केले.
बॅट्समन जॉर्ज गार्टेन विकले गेले नाही.
पंजाब किंग्सने ऋषी धवनला 55 लाखांना खरेदी केले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही. मात्र असे असतानाही त्याच्यावर बराच काळ बोली लावण्यात आली. राजस्थान, मुंबई आणि सनरायझर्स यांच्यात दीर्घ सामना झाला. शेवटी मुंबई इंडियन्सने त्याला 8 कोटींना विकत घेतले.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी वान डर डुसेन विकला गेला नाही.
अष्टपैलू खेळाडू रोव्हमन पॉवेलसाठी दिल्ली आणि चेन्नई यांच्यात मोठी बोली लागली होती. दिल्लीने त्याला 2.80 कोटींना विकत घेतले.
एविन लुईस आणि करुण नायर यांना कोणीही खरेदी केल नाही.
फिन ऍलन ला 80.0 लाख मध्ये आरसीबी ने विकत घेतले
समरजीत सिंह त्याची मूळ किंमत 20 लाखात चेन्नईच्या संघानं खरेदी केलंय.
यश दयालला गुजरातच्या संघानं 3.20 कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 20 लाख होती.
मूळचा उस्मानाबादचा असणारा राजवर्धन हंगरगेकर याला चेन्नई सुपरकिंग्सने 1.50 कोटींना खरेदी केलं आहे.
अंडर 19 विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार यश धुलला दिल्ली संघाने 50 लाखांना खरेदी केलं आहे.
मयंक मार्कंडेयला मुंबईच्या संघानं 65 लाखात खरेदी केलंय.
आयपीएल मेगा ऑक्शमध्ये चेन्नई आणि मुंबईच्या संघात चढाओढ पाहायला मिळाली. अखेर मुंबईच्या संघानं त्याला 1.30 कोटीत खरेदी केलं.
नवदीप सैनी आता राजस्थान रॉयलची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. त्याला राजस्थाननं 2.60 कोटी रुपयांत खरेदी केली आहे. त्याची मूळ किंमत 75 लाख होती.
युवा गोलंदाज चेतन साकरियाची 4.20 कोटीत विक्री झालीय. त्याला संघानं खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 50 लाख होती.
चेन्नईच्या संघानं ऑलराऊंडर शिवम दुबेला 4 कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 50 लाख होती.
मार्को जेसनला सनरायझर्सनं 4.20 कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 50 लाख होती.
वेस्ट इंडीजचा ऑलराऊंडर ओडीन स्मिथ आता पंजाबच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. पंजाबच्या संघानं त्याला 6 कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 1 कोटी होती.
विजय शंकरला गुजरातच्या संघानं 1.40 कोटी कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 50 लाख होती.
जयंत यादवला गुजरात टायटन्सनं 1.70 कोटीत खरेदी केलंय.
ऑलराऊंडर लियम लिविंगस्टोनला पंजाबच्या संघानं खरेदी केलंय. त्याच्यावर 11.50 कोटींची बोली लावण्यात आली. एक कोटी त्याची मूळ किंमत होती.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये इयॉन मार्गन अनसोल्ड ठरलाय. कोणत्याही संघानं त्याच्यावर बोली लावली नाही.
दिल्लीच्या संघानं मंदीप सिंहला 1.10 कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 50 लाख होती.
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं अजिंक रहाणेला 1 कोटीत खरेदी केलंय.
एडन मार्कमला सनरायझर्स संघानं 2.60 कोटी रुपयांत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 1 कोटी इतकी होती.
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, उमेश यादव आणि इशांत शर्मा या अनुभवी कसोटी क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशी ऑक्शमध्ये स्थान मिळाले नाही. परंतु, आज पार पडणाऱ्या मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी संघानी उस्तुकता दर्शवल्यानंतर त्यांचं भवितव्य ठरणार आहे.
आवेश खान लखनौच्या ताफ्यात, 10 कोटी रुपयांत केलं खरेदी
वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीला हैदराबाद संघाने चार कोटी रुपयात विकत घेतले आहे.
अनुज रावतला आरसीबीने 3.4 कोटी रुपयांत खरेदी केले आहे.
हरप्रीत बेररला पंजाबने खरेदी केलं आहे.
शाहबाज अहमदला आरसीबीने 2.4 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.
के. एस भरतला दिल्लीने दोन कोटी रुपयात खरेदी केलं आहे.
विष्णू विनोद आणि विष्णू सोळंकी अनसोल्ड राहिले आहेत.
ऑलराऊंडर राहुल तेवतिया आता गुजरातसाठी खेळणार आहे. गुजरातच्या संघानं त्याला 9 कोटीत खरेदी केलंय.
पंजाबच्या संघानं शाहरुख खानला 9 कोटीत विकत घेतलंय.
राहुल त्रिपाठीला सनरायझर्सनं 8. 50 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
युजवेंद्र चहलला राजस्थानच्या संघानं 6.50 कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 2 कोटी होती.
राहुल चाहरला पंजाबच्या संघानं 5.25 कोटी रुपयात खरेदी कलंय. त्याची मूळ किंमत 75 लाख इतकी होती.
कुलदीप यादव DC ची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. दिल्लीनं त्याला 2 कोटीत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत एक कोटी होती.
मुस्ताफिजूर रेहमान दिल्लीच्या संघात दाखल दाखल झालाय. त्याला दिल्लीच्या संघानं 2 कोटीत रुपयांत खरेदी केलंय.
आयपीएलच्या मागील हंगामात चेन्नईच्या संघाकडून खेळणारा शार्दुल ठाकूरला आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. दिल्लीच्या संघानं त्याला 10.75 कोटीत खरेदी केलंय.
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हैरबादच्या संघाकडूनच खेळणार आहे. हैदराबादच्या संघानं त्याला 4.20 कोटीत खरेदी केलंय.
आयपीएलच्या पुढच्या हंगामात मार्क वूड गुजरातच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. गुजरातनं त्याला 7.50 कोटीमध्ये खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 2 कोटी आहे.
लॉकी फर्ग्युसन आता गुजरातच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. संघानं त्याला 10 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी होती.
प्रसिद्ध कृष्णानं राजस्थान रॉयलच्या संघानं 10 कोटीत खरेदी रुपयांत खरेदी केली आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी इतकी होती.
वेगवान गोलंदाज दीपक चहरला चेन्नईच्या संघानं पुन्हा एकदा आपल्या संघात सामील करून घेतलंय. चेन्नईच्या संघानं त्याला 14 कोटीत खरेदी केलं आहे. ही चेन्नईच्या संघाकडून खेळाडूवर लावलेली सर्वाधिक बोली आहे.
भारतीय गोलंदाज टी नटराजनला हैदराबादच्या संघानं 4 कोटी रुपयांत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 1 कोटी होती.
सनरायझर्स हैदराबादच्या संघानं निकलस पूरनला 10.75 कोटी खरेदी केलंय.
दिनेश कार्तिकला 5.50 कोटी रुपयांत विक्री झालीय. आरसीबीनच्या संघानं त्याला खरेदी केलंय.
पंजाबच्या संघानं जॉनी बेयरस्टोला 6. 75 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
ईशान किशनला मुंबईच्या संघानं 15.25 कोटी रुपयांत खेरदी केलंय. युवराज सिंहनंतर आयपीएलमधील सर्वात महाग खेळाडू ठरलाय. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये इतकी होती.
अंबाती रायडूला चेन्नईच्या संघानं 6.75 कोटीत खरेदी केलंय.
मिशेल मार्शची 6.50 कोटी रुपयांत विक्री झालीय. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं त्याला खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 2 कोटी आहे.
लखनौच्या संघानं कृणाल पांड्याला 8.25 कोटी रुपयांत खरेदी केलंय. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये इतकी होती.
भारताचा ऑलराऊंडर वॉशिंन्टन सुंदरला हैदराबादच्या संघानं 8.75 कोटीत खरेदी केलंय. वॉशिंन्टन सुंदरची मूळ किंमत 1.50 कोटी इतकी होती.
श्रीलंकेच्या वानिंदु हरंगाला आरसीबीनं 10.75 कोटी रुपयांत संघानं खरेदी केलंय. त्याची बेस प्राईज एक कोटी इतकी होती.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सुत्रसंचालन करणारे ह्युग एडमिड्स भोवळ येऊन खाली कोसळल्याची घटना घडलीय.
लखनऊच्या संघानं दिपक हुड्डाला 5.75 कोटीत खरेदी केलं आहे.
आरसीबीच्या संघानं हर्षल पटेलला 10.75 कोटी रुपयांत खरेदी केलाय.
ऑलराऊंडर जेसन होल्डर आयपीएलच्या पुढील हंगामात लखनऊकडून खेळताना दिसणार आहे. लखनऊच्या संघानं त्याला 8.75 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
नितेश राणाला कोलकाताच्या संघानं कोटी रुपयांत 8 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
ड्वेन ब्रावो पुन्हा पिवळ्या जिर्सीत दिसणार आहे. चेन्नईच्या संघानं 4.4 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड ठरलाय.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैना अनसोल्ड ठरलाय.
देवदत्त पडीकलला राजस्थानच्या संघानं 7.5 कोटी रुपयांत खरेदी केलंय. याआधी तो आरसीबीकडून खेळायचा. त्याची बेस प्राईज 2 कोटी होती.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये डेविड मिलर अनसोल्ड ठरलाय.
राबिन उथप्पाला सीएसकेनं 2 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायरला राजस्थाने 8.5 कोटी रुपयांत खरेदी केलंय. याआधी शिमरॉन हेटमायर दिल्लीकडून खेळत होता. त्याची बेस प्राईज 1.50 कोटी होती.
लखनऊच्या संघानं मनीष पांडेला 4.60 कोटीत खरेदी केलंय. मनीष पांडे मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता.
तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरला दिल्लीच्या संघानं 6.25 कोटी रुपयांत खरेदी केलंय. त्याची ब्रेस प्राईज 2 कोटी होती.
क्विंटन डी कॉकला लखनऊच्या संघानं 6.75 मध्ये खरेदी केलंय.
दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज फॅफ डू प्लेसिसला आरसीबीच्या संघानं 7 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
भारताला वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला गुजरात जायंट्सनं 6.25 कोटी रुपयांत खरेदी केलंय.
भारताचा तडाखेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रुपयांत केकेआरच्या संघानं खरेदी केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली ठरली आहे. श्रेयस अय्यरची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती.
राजस्थान रॉयल्सनं 8 कोटी इतक्या किमतीला ट्रेन्ट बोल्टला संघात घेतलं आहे. ट्रेन्ट बोल्टवर बोली लावताना मुंबई इंडीयन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चढाओढ पाहायला मिळाली.
कागिसो रबाडाला पंजाबच्या संघानं 9.25 कोटीत केलं खरेदी. त्याची बेस प्राईज 2 कोटी होती.
कोलकाताच्या संघानं पुन्हा एकदा पेट कमिन्सला आपल्या संघात सामील करून घेतलंय. कोलकातानं त्याला 7.25 खरेदी केलंय. त्याची बेस प्राईज 2 कोटी होती.
भारताचा फिरकीपटू आर आश्विनला राजस्थानच्या संघानं 5 कोटीत खरेदी केलंय.
भारताचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन पंजाबच्या संघात सामील झालाय. पंजाबच्या संघानं त्याला 8.25 कोटी रुपयात खरेदी केलंय.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. आयपीलएलच्या मेगा ऑक्शनची सर्वांनाच उस्तुकता लागली होती. बंगळरू येथे दोन दिवस मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना संघात सामील करण्याचा प्रत्येक फ्रँचायझीचा प्रयत्न असेल.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनच्या एक दिवस आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं यादीत आणखी 10 खेळाडूंचा समावेश केलाय. यामुळं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 ऐवजी 600 खेळाडूंवर बोली लागणार आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनला थोड्यात वेळात सुरुवात होणार आहे. आयपीलएलच्या मेगा ऑक्शनची सर्वांनाच उस्तुकता लागली होती. बंगळरू येथे दोन दिवस मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. यंदाचा हंगाम खूप रोमांचक असणार आहे. कारण यावेळी आठऐवजी 10 संघ सहभागी होणार आहेत.
आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. आणि त्या शर्यतीची स्टार्टिंग लाईन ही आयपीएलचा मेगा लिलाव असणार आहे. हा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूत संपन्न होणार आहे. आयपीएलच्या या मेगा लिलावात उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात दहा फ्रँचाईझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल.
IPL 2022 Acution : 2022 च्या आयपीएल (IPL) रणसंग्रामासाठीची लिलाव प्रक्रिया आज पार पडणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे ही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत. यामध्ये कोणत्या खेळाडूला किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या
पार्श्वभूमी
IPL 2022 Acution : 2022 च्या आयपीएल (IPL) रणसंग्रामासाठीची लिलाव प्रक्रिया आज पार पडणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे ही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत. यामध्ये कोणत्या खेळाडूला किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या या हंगामात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या आहेत. त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. दरम्यान, आयपीएल लिलावाच्या इतिहासात गेल्या हंगामात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू यंदाच्या हंगामात खेळणार नाही. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर तब्बल 16.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस यंदाची आयपीएल खेळणार नाही. कारण त्याने गेल्या महिन्यातच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ख्रिस मॉरिस आतापर्यंत आयपीएलच्या 8 हंगामांमध्ये खेळला आहे. या काळात 4 वेगवेगळ्या फ्रेंचायझींसाठी तो खेळला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्ससाठी एकूण 81 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 8 च्या इकोनॉमी रेटने आणि 24 च्या सरासरीने 95 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, 155 च्या स्ट्राइक रेटने 618 धावा देखील केल्या आहेत.
आयपीएल 2021 च्या हंगामासाठी लिलावामध्ये काही परदेशी खेळाडूंची जोरदार चर्चा झाली होती. आरसीबीने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला 15 कोटींना आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटींना खरेदी केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनवर पंजाब किंग्जने 14 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण या सगळ्यावर राजस्थान रॉयल्स आणि ख्रिस मॉरिसने मात केली. मॉरिसला खरेदी करण्यासाठी राज्स्थानने आयपीएल इतिहासातील गेल्या 14 वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. त्यामुळे यंदा हे रेकॉर्ड मोडीत निघणार का? मॉरिसपेक्षा जास्त बोली लागणार का हे पाहणे देखील महत्त्वाटे ठरणार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या असून, त्यामुळं आयपीएलच्या आगामी म्हणजे पंधराव्या मोसमापासून दहा फ्रँचाईझी विजेतेपदाच्या शर्यतीत असतील. आणि त्या शर्यतीची स्टार्टिंग लाईन ही आयपीएलचा मेगा लिलाव असणार आहे. हा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूत संपन्न होणार आहे. आयपीएलच्या या मेगा लिलावात उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावात दहा फ्रँचाईझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -