Ishan Kishan Became Second Most Expensive Indian In History Of IPL Auction : बंगळुरु येथे सुरु असलेल्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोल लागत आहे. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. मुंबई इंडियन्स संघाने अपेक्षाप्रमाणे ईशान किशनला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने ईशान किशनसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

  


आयपीएल लिलावाच्या इतिहासात ईशान किशन सर्वाधिक बोली लागणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंह पहिल्या क्रमांकावर आहे. युवराज सिंहवर 16 कोटींची बोली लागली होती. ईशान किशनवर मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावली आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने लावलेली ही सर्वाधिक बोली आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात मुंबईने 10 कोटींपेक्षा जास्त बोली कधीही लावली नव्हती. 


कोणत्या संघाने कुणाला घेतलं विकत -
1) चेन्नई सुपर किंग्ज- ड्वेन ब्रावो (4.4 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), रॉबिन उथप्पा (2 कोटी)
2) मुंबई इंडियन्स-  ईशान किशन (15.25 कोटी)
3) दिल्ली कॅपिटल्स- डेविड वार्नर (6.25 कोटी), मिशेल मार्शची (6.50  कोटी), 
4) कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), 
5) गुजरात टायटन्स- मोहम्मद शामी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी),
6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- फाफ डू प्लेसीस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75), वानिंदु हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी)
7) लखनऊ सुपर जायंट्स- मनीष पांडेला (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुड्डा (5.75 कोटी), कृणाल पांड्या (8.75), क्विंटन डी कॉक (6.75)
8) राजस्थान रॉयल्स- आर अश्विन (5 कोटी), ट्रेण्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडीकल (7.50 कोटी),
9) पंजाब किंग्ज- शिखर धवन (8.25 कोटी), कगिसो रबाडा (9.25 कोटी). जॉनी बेयरेस्टो (6.75),
10) सनरायझर्स हैदराबाद- वॉशिंन्टन सुंदर ( 8.75 कोटी) 
अनसोल्ड- डेव्हिड मिलर, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकीब उल हसन, मोहम्मद नबी, मेथ्यू वेड, वृद्धमान साहा, सॅम बिलिंग्स,