Suresh Raina : 'वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि कोणाचा वेळ कधी बदलेल हे देखील सांगता येत नाही.' त्यामुळेच आता इंडियन प्रिमीयर लीग या सर्वात मनोरंजनात्मक लीगमधील सर्वांत मनोरंजनात्मक खेळाडू असलेला सुरेश रैना आता आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसणार नाही. एक काळ गाजवलेल्या मिस्टर आयपीएलला यंदा बेस प्राईसलाही कोणत्या संघाने खरेदी केलं नाही. त्याचा संघ चेन्नई सुपरकिंग्सने त्याला विकत न घेतल्याने अनेक सीएसके फॅन्सची मनं तुटली असून चेन्नईने एक पोस्ट करत रैनाला अलविदा केला आहे.



मागील आयपीएलमध्ये कमी सामन्यात संधी मिळालेल्या रैनाला खास खेळ दाखवता आला नाही. त्याआधीच्या आयपीएलमध्येही कोरोनाच्या संकटामुळे तो युएईत गेला नव्हता. ज्यानंतर यंदा त्याला संघाने रिटेन केलं नाही. पण लिलावात त्याला पुन्हा संघात घेतील अशी आशा साऱ्यांनाच होती. पहिल्या दिवशी कोणीही विकत न घेतल्याने दुसऱ्या दिवशीतरी अखेर चेन्नईचा संघ रैनाला विकत घेईल असे वाटत होते. पण 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्येही त्याला कोणीही विकत घेतले नाही. त्यामुळे एक काळ गाजवलेला रैना आता आयपीएल गाजवताना दिसणार नाही.


असा आहे अंतिम चेन्नई सुपर किंग्सचा ताफा (25 खेळाडू)


शिलेदार – रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha