Most Expensive Uncapped Player In History Of IPL :  आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी अनकॅप खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. अनकॅप खेळाडूंना मूळ किंमतीपेक्षा अनेक पटीने पैसे मोजत खरेदी करण्यात आले. राहुल तेवातिया आणि शाहरुख खान यांच्यासाठी तब्बल 9-9 कोटी रुपये मोजले.  पण वेगवान गोलंदाज आवेश खानने इतिहास रचला आहे. आवेश खानवर  रिकॉर्डतोड बोली लागली आहे. 

  
आयपीएलच्या मेगा लिलावात आवेश खानची कोटीच्या कोटी उड्डाणं. अवघ्या 20 लाख रुपये मूळ किंमतीच्या या वेगवान गोलंदाजावर पैशाचा पाऊस पडला आहे. लखनौ संघाने आवेश खानला तब्बल दहा कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला आहे. याआधी कृष्णप्पा गौतम याच्या नावावर होता. कृष्णप्पा गौतमला चेन्नई संघाने 9.25 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. 


या अनकॅप खेळाडूंवर पैशांचा पाऊस - 
शाहरुख खान (भारत)- 9 कोटी रुपये - पंजाब किंग्स 
राहुल तेवतिया (भारत- ) 9 कोटी रुपये -  गुजरात  
राहुल त्रिपाठी (भारत)- 8.50 कोटी रुपये - सनराइजर्स हैदराबाद 
शिवम मावी (भारत)- 7.25 कोटी रुपये - कोलकाता नाइट राइडर्स 
अभिषेक शर्मा (भारत)-  6.50 कोटी रुपये - सनराइजर्स हैदराबाद 
रियान पराग (भारत) - 3.80 कोटी रुपये - राजस्थान रॉयल्स 
डेवॉल्ड ब्रेविस (दक्षिण अफ्रिका)- 3 कोटी रुपये - मुंबई इंडियन्स   
अभिनव मनोहर (भारत)- 2.60 कोटी रुपये - गुजरात
कमलेश नागरकोटी (भारत) 1.10 कोटी - दिल्ली
शाहबाज अहमद (भारत), 2.4 कोटी - आरसीबी
अनुज रावत (भारत), 3.4 कोटी - आरसीबी
साई किशोर (भारत), 3 कोटी - गुजरात


आज दिवसभरात दहा संघांनी 74 खेळाडूंवर 388 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली. 74 खेळाडूंमध्ये 54 भारतीय आणि 20 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दिल्ली संघाने सर्वाधिक खेळाडूंना खरेदी केलं. तर पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने ईशानला 15.25 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. तर आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू राहिला. लखनौ संघाने आवेश खानला 10 कोटी रुपयांत खरेदी केलं. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिला आहे