मुंबई : आयपीएलच्या 18 व्या पर्वासाठी सर्व फ्रंचायजीकडून रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येत आहे. याशिवाय रिटेन केलेल्या खेळाडूंना किती रक्कम खर्च करुन रिटेन करण्यात आलं हे देखील जाहीर करण्यात येत आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं 2024 च्या आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. या संघातील खेळाडून रिंकू सिंगवर केकेआरनं यावेळी विश्वास टाकला आहे. केकेआरनं 13 कोटी रुपये मोजून रिंकू सिंगला रिटेन केलं आहे.
शाहरुख खानच्या लाडक्या खेळाडूवर केकेआरचा पैशांचा वर्षाव
रिंकू सिंगवर कोलकाता नाईट रायडर्सनं विश्वास दाखवला आहे.आयपीएलच्या सतराव्या हंगामात समाधानकारक कामगिरी करु न शकलेल्या रिंकू सिंगला 13 कोटी रुपये मोजून रिटेन करण्यात आलं आहे. रिंकू सिंगला 2024 च्या आयपीएलमध्ये केकेआरकडून 55 लाख रुपये मिळाले होते. 2025 च्या आयपीएलमध्ये केकेआरनं रिंकू सिंगला 12 कोटी 45 लाख रुपये वाढवून दिले आहेत.
केकेआरनं कुणाला किती पैसे दिले ?
केकेआरनं रिंकू सिंगला 13 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. तर, वरुण चक्रवर्तीला 12 कोटी, सुनील नरेनला 12 कोटी, आंद्रे रसेल 12 कोटी रुपये केकेआरनं मोजले आहेत. हर्षित राणाला आणि रमनदीप सिंग या दोघांसाठी देखील केकेआरनं प्रत्येकी चार कोटी रुपये मोजले आहेत.
55 लाख रुपयांमध्ये समाधानी असलेल्या रिंकूला 13 कोटी
आयपीएलच्या 17 व्या पर्वात रिंकू सिंगला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. मात्र, रिंकू सिंगच्या क्षमतेवर विश्वास दाखवत केकेआरनं यावेळी त्याला 13 कोटी रुपये मोजून रिटेन केलं आहे. रिंकू सिंगला गेल्या आयपीएलमध्ये केवळ 55 लाख रुपये मिळत होते. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याला 55 लाख रुपयांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रिंकू सिंगनं 55 लाख रुपयांमध्ये समाधानी असल्याचं म्हटलं होतं.
शाहरुख खानचा रिंकू सिंगवर विश्वास
शाहरुख खाननं रिंकू सिंगवर यापूर्वी देखील विश्वास दाखवला होता. टी 20 वर्ल्ड कपमध्ये मुख्य संघात निवड झाली नव्हती तेव्हा देखील रिंकू सिंगला आधार दिला होता. रिंकू सिंगची राखीव संघात निवड करण्यात आली होती.
श्रेयस अय्यर संघाबाहेर
केकेआरनं गेल्यावेळी मिशेल स्टार्कला 24.75 कोटी रुपये मोजले होते. त्याला देखील यावेळी रिटेन करण्यात आलेलं नाही. याशिवाय केकेआरला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला देखील रिटेन करण्यात आलेलं नाही. यावेळी केकेआरनं रिटेन केलेल्या सहा खेळाडूंसाठी 57 कोटी रुपये मोजले आहेत. आता केकेआरच्या पर्समध्ये 63 कोटी रुपये शिल्लक आहेत.
इतर बातम्या :
बुमराहला 18 कोटी, सूर्याला 16 कोटी, मुंबईकडून 5 खेळाडू रिटेन, रोहित आणि पांड्याला किती कोटी?