IPL 2025 Orange Cap and Purple Cap List: आयपीएल 2025 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात झालेल्या बंगळुरुने 6 विकेट्सने विजय मिळवला. या शानदार विजयासह बंगळुरूने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आणि आता ते गुरुवारी पंजाबविरुद्ध खेळतील. या लढतीतील विजेता थेट अंतिम फेरी गाठेल.
आयपीएल 2025 च्या स्पर्धेतील प्लेऑफसाठी 4 संघ ठरले. यामध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. आयपीएलमधील लीग टप्प्यातील सर्व सामने आता संपले. त्यामुळे सध्या ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
ऑरेंज कॅप कोणाकडे?
ऑरेंज कॅप सध्या गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनकडे आहे. साई सुदर्शनने 14 सामन्यांमध्ये 679 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 5 अर्धशतके आणि 1 शतक ठोकले आहे. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत साई सुदर्शनने 78 चौकार आणि 20 षटकार टोलावले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक धावा काढणारे टॉप 5 फलंदाज कोण आहेत, पाहा संपूर्ण यादी...
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या फलंदाजांची यादी-
साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - 14 सामन्यांमध्ये 679 धावा
शुभमन गिल (गुजरात टायटन्स) - 14 सामन्यांमध्ये 649 धावा
सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स) - 14 सामन्यांमध्ये 640 धावा
मिशेल मार्श (लखनऊ सुपर जायंट्स) - 13 सामन्यांमध्ये 627 धावा (प्लेऑफमधून बाहेर)
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - 13 सामन्यांमध्ये 602 धावा
पर्पल कॅप कोणाकडे?
पर्पल कॅप सध्या चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज नूर अहमदकडे आहे. त्याने 14 सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, त्याचा संघ सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, त्याचा प्रवास संपला आहे, त्यामुळे लवकरच त्याच्याकडून ही कॅप हिसकावून घेतली जाऊ शकते. आतापर्यंत, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या टॉप 5 यादीत, नूर वगळता सर्वांचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या गोलंदाजांची यादी-
नूर अहमद (चेन्नई सुपर किंग्ज)- 14 सामन्यात 24 विकेट्स (प्लेऑफमधून बाहेर)
प्रसिद्ध कृष्णा (गुजरात टायटन्स)- 14 सामन्यात 23 विकेट्स
ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स)- 14 सामन्यात 19 विकेट्स
जोश हेझलवूड (आरसीबी)- 10 सामन्यात 18 विकेट्स
अर्शदीप सिंग (पंजाब किंग्ज)- 14 सामन्यात 18 विकेट्स
आयपीएल 2025 मधील प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक-
29 मे- क्वालिफायरच्या 1: पंजाब विरुद्ध बंगळुरु (मुल्लानपूर स्टेडियम)
30 मे- एलिमिनेटर: गुजरात विरुद्ध मुंबई (मुल्लानपूर स्टेडियम)
1 जून- क्वालिफायरच्या 2: पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात पराभूत झालेला संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता (नरेंद्र मोदी स्टेडियम)
3 जून- आयपीएल अंतिम: पहिल्या क्वालिफायरच्या विजयी झालेला संघ विरुद्ध दुसऱ्या क्वालिफायरमधील विजयी संघ (नरेंद्र मोदी स्टेडियम)