जयपूर : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals)  सहा विकेटनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) पराभूत करत चौथ्या मॅचमध्ये विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं आरसीबीला पराभूत करत गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. आरसीबीकडून विराट कोहलीनं आणि राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरनं शतक केलं. विराट कोहलीनं ज्यावेळी शतक पूर्ण केलं त्यावेळी मॅच पाहण्यासाठी आलेल्या राजस्थानच्या चाहतीच्या कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   


मॅचच्या सुरुवातीपासून विराट कोहलीची फॅन राजस्थान रॉयल्सची जर्सी घालून आलेली होती. ती राजस्थानला पाठिंबा देताना दिसून येत होती. विराट कोहली ज्यावेळी 99 धावांवर पोहोचला त्यावेळी तिनं राजस्थान ऐवजी आरसीबीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली शतक पूर्ण करणार हे लक्षात येताच तिनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जर्सी घातली. कॉमेंटटर्सनी या घटनेची मजा घेतली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






मॅचमध्ये अनेक विक्रमांची नोंद


आयपीएलच्या 19 व्या मॅचमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. आयपीएलच्या एकाच मॅचमध्ये दोन शतकांची नोंद झाली आहे. एक शतक विराट कोहलीनं केलं तर दुसरं शतक जोस बटलरनं केलं. विराट कोहलीनं आयपीएलमधील आठवं शतक केलं. जोस बटलरनं आयपीएलमधील सहावं अर्धशतक केलं. जोस बटलर आयपीएलमध्ये राजस्थान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये आठवं शतक केलं मात्र 67 बॉलमध्ये 100 धावा केल्यानं ट्रोल केलं जात आहे.  विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला आहे.  


जोस बटलर आणि संजू सॅमसनची खेळी गेमचेंजर ठरली


राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आरसीबी विरुद्ध देखील शुन्यावर बाद  झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसन आणि जोस बटलरनं डाव सावरला. संजू सॅमसननं 69 धावा केल्या. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर जोस बटलरनं इतर फलंदाजांच्या साथीनं संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीनं विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर 3 विकेटवर 183 धावा केल्या होत्या.  मात्र, जोस बटलरच्या 100 धावांच्या जोरावर राजस्थाननं हे आव्हान सहजपणे पार केलं. राजस्थाननं सलग चार मॅचमधील विजयासह 8 गुणांच्या आधारे गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. 


संबंधित बातम्या : 


IPl 2024 Romario Shepherd : 4,6,6,6,4,6 शेफर्डच्या वादळात नॉर्खियाचा पालापाचोळा, पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचे पैसे फिटले


LSG vs GT Toss Update : लखनौनं होम ग्राऊंडवर टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग करणार, गुजरात कमबॅक करणार?