SRH vs PBKS Live score, IPL 2024 : हैदराबाद अन् पंजाब आमने सामने येणार, किंग्ज शेवट विजयानं करणार?

IPL 2024, SRH vs PBKS Live score : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत. हैदराबाद विजयासह दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

युवराज जाधव Last Updated: 19 May 2024 07:15 PM
हैदराबादचा चार विकेटने विजय

हैदराबादचा चार विकेटने विजय... हैदराबादची गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप

क्लासेन बाद

क्लासेन 46 धावांवर बाद झाला. मोक्याच्या क्षणी फेकली विकेट.... 

हैदराबादला सहावा धक्का

हैदराबादला सहावा धक्का बसलाय. शाहबाज तीन धावा काढून बाद... 

हैदराबादला चौथा धक्का

नितीश रेड्डीच्या रुपाने हैदराबादला चौथा धक्का... 37 धावा काढून रेड्डी बाद.... हैदराबाद 4 बाद 176 धावा

हैदराबादला तिसरा धक्का

शशांक सिंहने 57 धावांची भागिदारी फोडली.. शशांक सिंह याने अभिषेक शर्माला पाठवले तंबूत.. हैदराबाद 3 बाद 129 धावा... 



अभिषेक शर्मा 28 चेंडूत 66 धावांवर बाद..

अभिषेक शर्माचं शानदार अर्धशतक

215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक ठोकलेय. अभिषेक शर्माने फक्त 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. या खेळीत त्याने चार षटकार ठोकले.

हैदराबादला दुसरा धक्का

अभिषेक त्रिपाठी 33 धावांवर बाद... हैदराबाद दोन बाद 72 धावा

हैदराबादला पहिला धक्का

ट्रेविस हेड गोल्डन डकचा शिकार.. अर्शदीप सिंहने पहिल्याच चेंडूवर पाठवले तंबूत..

पंजाबची 214 धावांपर्यंत मजल

पंजाबची 214 धावांपर्यंत मजल, जितेश शर्माने अखेरच्या षटकात फिनिशिंग टच दिला. दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. हैदराबादला विजयासाठी 215 धावांचे आव्हान

पंजाबला पाचवा धक्का

आशुतोष शर्मा दोन धावांवर तंबूत परतला. मोठा फटका मारण्याच्या नादात परतला तंबूत.. पंजाब पाच बाद 187 धावा.

पंजाबला चौथा धक्का

मोक्याच्या क्षणी रायली रुसो बाद... 24 चेंडूत 49 धावा काढून बाद... पॅट कमिन्सने घेतली विकेट

पंजाबला तिसरा धक्का

शशांक सिंह धावबाद झाला.. शशांक सिंह फक्त दोन धावा काढून बाद.... पंजाब 16 षटकात 3 बाद 174 धावा

पंजाबला दुसरा धक्का

प्रभसिमरनच्या रुपाने पंजाबला दुसरा धक्का... त्यानं 71 धावांची खेळी केली. पंजाब 2 बाद 151 धावा

प्रभसिमरनचे शानदार अर्धशतक

हैदराबादविरोधात प्रभसिमरन यानं शानदार अर्धशतक टोकले. 34 चेंडूत ठोकलं अर्धशतक.  पंजाब एक बाद 109 धावा. 

पंजाबला पहिला धक्का

अथर्व तायडेच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का बसलाय. टी नजराजन याने अथर्वला 47 धावांवर बाद केलेय. पंजाब 1 बाद 97 धावा...

पंजाबची सावध सुरुवात, पॉवरप्लेमध्ये बिनबाद 61 धावा

पंजाबनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अथर्व तायडे आणि प्रभासिमरन सिंह यांनी सावध सुरुवात करत बिनबाद 61 धावा केल्या. 

PBKS vs SRH : पंजाबनं टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय

PBKS vs SRH : पंजाबनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पंजाब विजयानं समारोप करणार?

पंजाब किंग्ज यंदाच्या आयपीएलमधून मुंबई इंडियन्सनंतर बाहेर पडली. आता आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत समारोप करण्याचा किंग्जचा प्रयत्न असेल. 

SRH vs PBKS Head to Head : हैदराबादचं पंजाबवर वर्चस्व

आयपीएलमध्ये आतापर्यंत हैदराबाद आणि पंजाब 22 वेळा आमने सामने आले. यात हैदराबादनं 15 मॅच जिंकल्या तर पंजाबनं 7 मॅच जिंकल्या आहेत. 

PBKS vs SRH : पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत आघाडीचा हैदराबादचा प्रयत्न

सनरायजर्स हैदराबादचा आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न आहे.

पंजाब किंग्ज जितेश शर्माच्या नेतृत्त्वात खेळणार

पंजाबचा नियमित कॅप्टन शिखर धवन दुखापतग्रस्त असल्यानं सॅम करनकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. सॅम करन आता मायदेशी गेल्यानं पंजाबचं नेतृत्त्व मराठमोळा जितेश शर्मा करणार आहे.

SRH vs PBKS Live score Updates :हैदराबाद पंजाब आमने सामने 

आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमने सामने येणार आहेत.

पार्श्वभूमी

SRH vs PBKS Live score Updates, IPL 2024 :आयपीएलमध्ये आज लीग स्टेजमधील शेवटचे दोन सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात सनराजयर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमने सामने येतील. हैदराबादचा मॅचमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर जाण्याचा प्रयत्न असेल. तर, जितेश शर्माच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जचा विजयानं स्पर्धेचा समारोप करण्याचा प्रयत्न असेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.