Hasan Mushrif on Jayant Patil : तब्बल 12 जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तिपीठ महामार्गविरोधात काल (12 मार्च) आझाद मैदानात हजारो शेतकऱ्यांनी एल्गार करत शक्तिपीठ होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत सरकारला सुद्धा निर्णायक इशारा दिला. या मोर्चामध्ये बोलताना महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते जयंत पाटील यांनी व्यासपीठावरून केलेल्या राजकीय वक्तव्याने मात्र राजकीय भूवया उंचावल्या आणि काही काळ शक्तीपीठ महामार्गाचे आंदोलन बाजूला राहिलं आणि जयंत पाटील यांच्या मनामध्ये चाललं आहे तरी काय असाच प्रश्न उपस्थित झाला.
'मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही'
माझं काही खरं नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे अनेक चर्चांना तोंड फोडलं आहे. त्यामुळे जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच आता त्याला आणखी खतपाणी मिळालं आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा त्यांचे कधी काळचे सहकारी हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर नाराज आहेत हे नक्की असल्याचा हसन मुश्रीफ म्हणाले. मुश्रीफ यांनी सांगितले की मला नागपूरला त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही. सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणे व हे सर्व टिकून फार अवघड आहे याची त्यांना कल्पना आली असावी. त्यांचं मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शक्तीपीठ महामार्ग मुद्द्यावरून मी शेतकऱ्यांसोबत, पण
दुसरीकडे, शक्तिपीठ महामार्गावर बोलताना सुद्धा मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग मुद्द्यावरून मी शेतकऱ्यांसोबत आहे. मात्र, शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबत निवडणुकीपूर्वी तुम्ही काय घेतलं, काय नाही हे संजय राऊत यांना माहिती असेल तर त्यांनी पुराव्यानिशी सादर करावं, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांनी पुढे सांगितले की अचानकपणे काही शेतकरी समर्थनासाठी पुढे ये आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ठरवायचे की काय करायचं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेला मंत्रीपदावर मुश्रीफ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की धनंजय मुंडे यांचेकडील खातं अजित दादांकडेच आहे. जर धनंजय मुंडे निर्दोष झाले तर ते त्यांना खाते द्यावे लागेल असे त्यांनी म्हटले. इतिहासावरून वादग्रस्त वक्तव्य करत सुटलेल्या नितेश राणेंचा अजितदादा यांनी समाचार घेतला आहे. मी नितेश यांना भेटून त्याबाबत कल्पना देणार असल्याचे ते म्हणाले. ते माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे त्यांना भेटून चर्चा करेन, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.