Shubman Gill appointed Captain of Gujarat Titans : टीम इंडियाचा (Team India) 'प्रिन्स' आणि धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) कडे गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाच्या कर्णधारपदाची (Captain) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतल्यानंतर आता संघाची धुरा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल सांभाळणार आहे. गुजरात टायटन्स संघाचे याची अधिकृत घोषणा केली आहे. गुजरात टायटन्स संघाने एक्स मीडिया म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडलवरून नव्या कर्णधाराची घोषणा करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देत "कॅप्टन गिल", असं म्हटलं आहे.


शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कॅप्टन


आगामी आयपीएलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सला नवा कर्णधार मिळाला आहे. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार मुंबई इंडियन्स संघात परतला आहे, त्यामुळे आता संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या ट्रेडपैकी एक मानला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. नुकत्याच हा ट्रेड पूर्ण झाला आहे. आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू झाली असून सर्व संघांनी कायम आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. 






शुभमन गिलवर मोठी जबाबदारी


गुजरात टायटन्स फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडे सोपवल्यानंतर सोमवारी शुभमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल 2024 सीझनमध्ये गिलचा सीनियर क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपदाची भूमिका बजावताना दिसणार आहे.


कॅप्टन गिलची पहिली प्रतिक्रिया


याबाबत शुभमन गिलने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटतो आणि एवढ्या चांगल्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार. आम्ही दोन हंगामात दमदार कामगिर केली आहे आणि मी या रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे." espncricinfo नं शुभमन गिलच्या प्रतिक्रियेबाबत वृत्त दिलं आहे.






हार्दिक पांड्याला 15 कोटींमध्ये ट्रेड


मुंबईने जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॅनसेन, झ्ये रिचर्डसन, रमणदीप सिंग, राघव गोयल, अर्शद खान आणि हृतिक शोकीन यांना सोडलं आहे. आयपीएलमध्ये संघ ट्रान्सफर विंडो दरम्यान संघ खेळाडू बदलू शकतात. रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला 15 कोटींमध्ये ट्रेड केलं असं सांगितलं जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Yashasvi Jaiswal : वयाच्या एकविशीत 'यशस्वी' वाटचाल! भीम पराक्रम केलाच, पण केलेल्या चुकीवर मोठ्या मनानं माफी सुद्धा मागितली