जयपूर : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आमने सामने येत आहेत. राजस्थानचा कप्तान संजू सॅमसन (Sanju Samson) यानं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसननं आजच्या मॅचसाठी संघात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असं देखील म्हटलं. दुसरीकडे बंगळुरुचा कप्तान फाफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) यानं आजच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी असल्याचं म्हटलं.

  


राजस्थान विजयाचा चौकार मारणार? 


संजू सॅमनसच्या नेतृत्त्वातील  राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सला आज होम ग्राऊंडवर यंदाच्या आयपीएलमधील चौथा विजय मिळवण्याची संधी आहे. राजस्थान रॉयल्स आज संघात कोणताही बदल करणार नसल्याचं संजू सॅमसननं सांगितलं. दुसरीकडे फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील आरसीबीला दुसऱ्या विजयाची प्रतीक्षा आहे. गेल्या  चार मॅचमध्ये आरसीबीला  तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला तर  एका सामन्यात विजय मिळालेला आहे. 


विराट कोहलीवर आरसीबीची मदार 


आरसीबीमध्ये दिग्गज फलंदाज आहेत मात्र त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य नसल्याचं पाहायला मिळालं आहे. आरसीबीकडे विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदार यांच्यासारखे स्फोटक फलंदाज आहेत. मात्र, त्यांना एक मॅच वगळता चांगली कामगिरी करता आलेली नाही. 


आरसीबीचा पहिल्या विजेतेपदाचा मार्ग खडतर


आरसीबीला आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये तरी आरसीबी विजेतेपद मिळवेल अशी आशा त्यांच्या चाहत्यांची होती मात्र बंगळुरुची सुरुवात पराभवानं झालेली आहे. चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला चेन्नई  सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता आजच्या मॅचमध्ये  राजस्थानला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत करुन विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न आरसीबीचा असेल. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा बंगळुरुला पराभूत करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाण्याचा प्रयत्न असेल. राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थाननं पहिल्या तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 


आरसीबीची टीम


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल


राजस्थानची प्लेईंग इलेव्हन


यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कॅप्टन), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, नंद्रे बर्गर, युजवेंद्र चहल


संबंधित बातम्या 


RCB मियां मॅजिक करणार, थेट सिराजला सलामीला धाडणार? 


ब्लँक चेक घे, हवी ती रक्कम टाक, पण परत KKR मध्ये ये, शाहरुख खानची गौतम गंभीरला ऑफर