मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवातीच्या मॅचेसमधील कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएल सुरु होण्यापूर्वीपासून वादांना सामोरं जावं लागलं आहे. मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) गुजरात टायटन्समधून परत आणून कर्णधार पद सोपवलं होतं. हार्दिकला कर्णधारपद सोपवताना रोहित शर्माकडून ते काढून घेण्यात आलं होतं यामुळं मुंबईचे चाहते नाराज झाले होते. मुंबईच्या चाहत्यांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रत्यक्ष आयपीएल जेव्हा सुरु झालं तेव्हा मुंबई इंडियन्सला पहिल्या तीन मॅचमध्ये पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. यावेळी मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर अनेक खेळाडूंनी भूमिका मांडली आहे. 


मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हे सामने अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाले होते. या मॅचसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्यावर शेरेबाजी केली होती. हार्दिक पांड्यानं देखील सोशल मीडिया पोस्ट लिहून त्याची भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. रवी शास्त्री,संजय मांजरेकर, एस.श्रीसंत यांच्यासह अनेकांनी आपली भूमिका मांडली होती. आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं देखील या मुद्यावर माडली आहे.




सौरव गांगुली काय म्हणाला?


भारतीय टीमचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं मुंबई इंडियन्स, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि प्रेक्षकांचं वर्तन यावर भाष्य केलं आहे. सौरव गांगुलीनं हार्दिक पांड्याबाबत ज्या प्रकारे प्रेक्षकांकडून वर्तन केलं जात आहे ते चुकीचं आहे, असं म्हटलंय. सौरव गांगुलीनं पुढं बोलताना म्हटलं की रोहित शर्मा हा एका वेगळ्या क्लासचा खेळाडू आहे. त्याच्या कामगिरी ही वेगळ्या स्तरावरील आहे. 


मुंबईच्या कर्णधारपदाच्या वादावर सौरव गांगुली काय म्हणाला?


रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचं 10 वर्षांहून अधिक काळ नेतृत्त्व केलं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं 2020 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतरच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील मुंबईला विजेतेपद मिळवता आलं नव्हतं. यानंतर मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं 2021 ला संघातून रिलीज केलेल्या हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेतलं. गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्याला मुंबईमध्ये आणून कर्णधार पद सोपवलं. या सर्व घटनांमुळं मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.  सौरव गांगुलीनं हार्दिक पांड्यानं मुंबईचं कर्णधारपद भूषवणं हा फ्रँचायजीचा निर्णय असून हार्दिक पांड्याची चूक नाही, असं सौरव गांगुलीनं म्हटलं.     


संबंधित बातम्या :