Jaipur Weather Report And Forecast जयपूर : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज दोन तुल्यबळ टीम आमने सामने येणार आहेत. आयपीएलमध्ये आज 38 वी मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात होणार आहे. आज ही मॅच सायंकाळी साडे सात वाजता जयपूरच्या  सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानचे प्रेक्षक या मॅचसाठी उत्सुक आहेत. मॅच सुरु होण्यापूर्वी जयपूरमधील वातावरण कसं राहिल हे पाहणं महत्त्वाचं आहे. 


राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सच्या मॅचचा वेदर रिपोर्ट


एक्यू वेदरच्या रिपोर्टनुसार जयपूरमध्ये दिवसाचं तापमान 35 अंश सेल्सियस असेल तर रात्रीच्या वेळी तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं तापमान असेल. आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून दिवसा पावसाची शक्यता ४ टक्के असेल तर रात्री २ टक्के पावसाची शक्यता आहे.  


राजस्थान टॉपवर,मुंबई सातव्या स्थानी


राजस्थान रॉयल्स यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी सहा मॅच जिंकून टॉपवर आहे. राजस्थान रॉयल्सला एका मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान 12 गुणांसह + 0.677 च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.  


दुसरीकडे मुंबई इंडियन्सची स्थिती वेगळी आहे. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये सात मॅच खेळल्या आहेत. मुंबईला चार मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, त्यांनी तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्जला पराभूत केलं आहे. मुंबई सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सनं -0.133 इतकं रनरेट आहे. 


मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शेवटची लढत


यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यापूर्वी एकदा आमने सामने आले आहेत. आयपीएलमधील 14 वी मॅच वानखेडे स्टेडियमवर झाली होती. त्यामध्ये राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट वर 124 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सनं 15.3 ओव्हरमध्ये 4 विकेटवर 127 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सनं सहा विकेटनं मॅच जिंकली होती.  


मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यापूर्वी 29 वेळा आमने सामने आले आहेत. मुंबई इंडियन्सनं 15 वेळा मॅच जिंकल्या आहेत. तर, राजस्थान रॉयल्सनं 13 मॅच जिंकल्या आहेत. 29 पैकी एका मॅचचा निकाल लागला नव्हता.  


मुंबई इंडियन्स पराभवाचा वचपा काढणार?


मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सनं होम ग्राऊंडवर पराभूत केलं होतं. राजस्थान रॉयल्स केलेल्या पराभवाची व्याजासह परतफेड करण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रोमारियो शेफर्ड यांच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. राजस्थानला त्यांच्या होमग्राऊंडवर पराभूत करण्यात मुंबईला यश येतं का ते पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या :


GT vs PBKS : पंजाबची अखेरच्या ओव्हरपर्यंत लढत, गुजरात टायटन्सवर विजयासाठी संघर्षाची वेळ, राहुल तेवतिया ठरला मॅच फिनिशर


Virat Kohli : विराट कोहलीचं वर्तन चुकीचं, वाद घालायला नको होता, इरफान पठाणनं सगळं समजावून सांगितलं...