IPL 2024 RCB vs GT: गुजरात टायटन्सच्या पराभवाची मालिका सुरुच, आरसीबीचा चार विकेटनं विजय

IPL 2024 RCB vs GT: गुजरात आणि बंगळुरुला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 04 May 2024 10:58 PM
गुजरात टायटन्सचा आणखी एक पराभव, आरसीबीचा दणदणीत विजय

गुजरात टायटन्सनं आणखी एक सामना गमावला. आरसीबीनं 4 विकेटनं विजय मिळवला.

आरसीबीला लागोपाठ दोन धक्के, डुप्लेसिस आणि विल जॅक्स बाद

गुजरात टायटन्सनं आरसीबीला लागोपाठ दोन धक्के दिले. फाफ डु प्लेसिस 64  आणि रजत पाटीदार 1 रन करुन बाद झाला.

गुजरात टायटन्सचा डाव 147 धावांवर आटोपला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सला 147 धावांवर रोखलं. 

गुजरातला सहावा धक्का, राशिद खान 18 धावांवर बाद

गुजरात टायटन्सला सहावा धक्का बसला असून राशिद खान 18  धावांवर बाद झाला आहे. यश दयाळनं त्याला बाद केलं.

डेव्हिड मिलर 30 धावांवर बाद, गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का

डेव्हिड मिलर 30 धावांवर बाद झाला असून गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का बसला आहे.  

गुजरात टायटन्सच्या 50 धावा पूर्ण

गुजरात टायटन्सनं तीन विकेटवर 50 धावा दहाव्या ओव्हरमध्ये केल्या. 

गुजरातला तिसरा धक्का, साई सुदर्शन 6 धावांवर बाद

गुजरात टायटन्सला तिसरा धक्का बसला आहे. साई सुदर्शन 6 धावा करुन बाद झालाय.

मोहम्मद सिराजचा गुजरातला आणखी एक धक्का, शुभमन गिल बाद

मोहम्मद सिराजनं गुजरातला आणखी एक धक्का दिला आहे. शुभमन गिल 2 धावा करुन बाद झाला आहे.

गुजरात टायटन्सला पहिला धक्का, रिद्धिमान साहा बाद

मोहम्मद सिराजनं गुजरात टायटन्सला पहिला धक्का दिला आहे. रिद्धिमान साहा एक रन करुन बाद झाला आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं यापूर्वी गुजरातचा त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभव केला होता.

RCB vs GT Live Score : शुभमन गिल फॉर्ममध्ये परतणार

शुभमन गिलसाठी आयपीएलचं यंदाचं पर्व चांगलं राहिलेल नाही. शुभमनच्या कॅप्टनशिपची चर्चा झाली मात्र त्याची वैयक्तिक कामगिरी चांगली राहिली नाही. गिलचा प्रयत्न गुजरातला विजय मिळवून देताना फॉर्मध्ये परतण्याचा देखील असेल.

RCB vs GT Live Score : ग्लेन मॅक्सवेलवर असणार नजर

ग्लेन मॅक्सवेलनं दुखापतीनंतर कमबॅक केलं आहे. गेल्या मॅचमध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली नव्हती. आजच्या मॅचमध्ये त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. 

गुजरातची संभाव्य प्लेइंग XI:

शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा/मॅथ्यू वेड (विकेटकीपर), साई सुधारसन, अजमतुल्ला ओमरझाई/विजय शंकर, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, आर. साई किशोर, संदीप वॉरियर, नूर अहमद/ स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा 

आरसीबीची संभाव्य प्लेइंग XI:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल 

विराट कोहलीची फटकेबाजी

गुजरातविरुद्ध कोहलीची 'विराट' कामगिरी

राशीद खानची फटकेबाजी

कर्णधाराचा जोरदार सराव

शुभमन गिल अन् विराट कोहलीची भेट

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संपूर्ण संघ

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (c), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (w), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत , हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग, ग्लेन मॅक्सवेल, रीस टोपले, टॉम कुरन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार

गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

रिद्धिमान साहा(w), शुभमन गिल(c), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, साई सुधरसन, शरथ बीआर, मानव सुथार, विजय शंकर, दर्शन नळकांडे, मॅथ्यू वेड, उमेश यादव, केन विल्यमसन, जयंत यादव, अभिनव मनोहर, जोशुआ लिटल, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, सुशांत मिश्रा

पार्श्वभूमी

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना होणार आहे. एम.चिन्नास्वामी मैदानावर हा सामना रंगेल. गुजरात आणि बंगळुरुला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. गुणतालिकेत सध्या बंगळुरुचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे, तर गुजरातचा संघ आठव्या स्थानावर आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.