कोलकाता : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात काल ईडन गार्डन्सवर मॅच पार पडली. या मध्ये कोलकाताकडून सुनील नरेननं आक्रमक फलंदाजी करत शतक झळकवलं. आयीपएलमधील हे त्याचं पहिलं शतक ठरलं. सुनील नरेननं या शतकाचं क्रेडीट गौतम गंभीरला दिलं. गौतम गंभीरनं सलामीला खेळण्याची संधी दिल्याचं त्यानं म्हटलं. सुनील नरेननं 49 बॉलमध्ये शतक पूर्ण केल्यानंतर वेस्टइंडीजचा कॅप्टन देखील खुश जाला असून त्यानं नरेनला मोठी ऑफर दिली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सनं सुनील नरेनच्या शतकी खेळीच्या जोरावर 6 बाद 223 धावा केल्या होत्या. सुनील नरेननं 56 बॉलमध्ये सहा षटकार आणि 13 चौकारांसह 109 धावांची खेळी केली. सुनील नरेनच्या कामगिरीवर वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोव्हमन पॉवेलनं मोठं वक्तव्य केलं आहे.
सुनील नरेनची यंदाच्या आयपीलमधील कामगिरी पाहून वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोव्हमन पॉवेलनं मोठी ऑफर दिली आहे. सुनील नरेननं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती मागं घेऊन 2024 टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची विनंती केली आहे. सुनील नरेननं गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
रोव्हमन पॉवेलनं म्हटलं की गेल्या 12 महिन्यांपासून तो सुनील नरेनला टी-20 मधील निवृत्ती मागं घेण्यासाठी विनंती करतोय. मात्र, त्यानं सर्वांपासून अंतर ठेवलं आहे. आम्ही त्याचे सर्व चांगले मित्र केरॉन पोलार्ड, डिवेन ब्राव्हो, निकोलस पूरन याच्याशी चर्चा केली आहे. वर्ल्ड कपच्या संघ निवडीपूर्वी सुनील नरेन निर्णय बदलेल अशी आशा असल्याचं पॉवेलनं म्हटलं.
रोव्हमन पॉवेल सध्या राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळतोय. त्यानं तुम्ही कोणत्याही क्षणी 220 धावांचा पाठलाग करु शकता असं म्हटलं. पॉवेलनं 13 बॉलमध्ये 26 धावा केल्या. पॉवेलला सुनील नरेननं बाद केलं.
सुनील नरेन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत
राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक झळकवणाऱ्या सुनील नरेननं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील आघाडी घेतली आहे. 276 धावांसह सुनील नरेन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी आहे. सुनील नरेनच्या वरती विराट कोहली 361 धावा आणि रियान पराग 318 धावांसह पुढे आहे.
दरम्यान, सुनील नरेननं कोलकाता नाईट रायडर्ससाठी 2017 मध्ये देखील सलामीला बॅटिंग केली होती. गौतम गंभीरनं सुनील नरेनला सलामीला बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सुनील नरेननं 172.30 च्या स्ट्राइक रेटनं 224 धावा केल्या होत्या आणि 10 विकेट देखील घेतल्या होत्या. तर, यंदाच्या आयपीएलमध्ये नरेननं 7 विकेट घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या :