Rinku Singh Reaction on Yash Dayal last Over बंगळुरु: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेस केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुनं 27 धावांनी पराभूत केलं. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासठी चेन्नईवर 18 धावांनी विजय मिळवणं आवश्यक होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. यश दयाळनं एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि आरसीबीची प्लेऑफमधील एंट्री निश्चित झाली. यश दयाळनं घेतलेली विकेट महेंद्रसिंह धोनीची होती त्यामुळं तिला महत्त्व आहे. बंगळुरुसाठी गेमचेंजर कामगिरी करणाऱ्या यश दयाळवर केकेआरच्या रिंकू सिंगनं अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.  


रिंकून सिंगनं यश दयाळसाठी सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. यश दयाळनं अखेरच्या ओव्हरमध्ये एक विकेट घेतली आणि सात धावा दिल्या. यशसमोर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज खेळाडू होते. मात्र, यश दयाळनं आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून दिला. रिंकू सिंगनं यश दयाळचा फोटो स्टोरीला ठेवत "भगवान की योजना यार" अशी कमेंट लिहिली.  


रिंकूच्या स्टोरीचं महत्त्व का?  


यश दयाळ गेल्या वर्षी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या रिंकू सिंगनं यश दयाळच्या बॉलिंगवर दमदार फटकेबाजी केली होती. रिंकू सिंगनं यश दयाळला पाच सिक्स मारले होते. यानंतर यश दयाळच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं.  


यश दयाळची अखेरच्या ओव्हरमध्ये दमदार कामगिरी


चेन्नई सुपर किंग्जच्या डावाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये फाफ डु प्लेसिसनं बॉलिंगची जबाबदारी यश दयाळला दिली होती. यश दयाळला त्याच्या ओव्हरमध्ये कोणत्याही स्थितीत 17 धावा द्यायच्या नव्हत्या. पहिल्याच बॉलवर महेंद्रसिंह धोनीनं सिक्स मारला. धोनीनं मारलेला बॉल थेट मैदानाबाहेर गेला. यामुळं नवीन बॉल घ्यावा लागला आणि यश दयाळनं पुढच्या पाच बॉलमध्ये एक रन देत एक विकेट घेतली. दुसऱ्या बॉलवर धोनी आऊट झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूरनं एक रन केली. रवींद्र जडेजाला दोन बॉलमध्ये 10 करायच्या होत्या. जडेजाला एकही रन करता आली नाही.


दरम्यान,  चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत रॉयल चलेंजर्स बंगळुरुनं नवव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.  


संबंधित बातम्या :



Faf Du Plessis : धोनी मैदानावर असेपर्यंत मॅच वाचवणं अवघड होतं.. फाफ डु प्लेसिसची कबुली, म्हणाला....