बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) चेन्नईला (CSK) 27 धावांनी पराभूत करत आयपीएलच्या (IPL Playoffs) प्लेऑफमध्ये प्रवेश केला. धोनी आणि जडेजानं अखेरच्या ओव्हरपर्यंत मजल मारत आरसीबीचं टेन्शन वाढवलं होतं. धोनी बाद झाला आणि आरसीबीच्या प्लेऑफचा मार्ग सुकर झाला. मॅच  संपल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसनं (Faf Du Plessis) मोठं वक्तव्य केलं. जोपर्यंत महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) क्रीजवर होता तोपर्यंत तो मॅच आमच्या हातून घेऊन जाईल, असं वाटत असल्याचं फाफ  डु प्लेसिसनं म्हटलं. 


फाफ डु प्लेसिस म्हणाला की,महेंद्रसिंह धोनी मैदानावर होता तोपर्यंत चेन्नई सुपर किंग्ज मॅच आमच्या  हातून घेऊन जाईल किंवा नेट रनरेटमध्ये आम्हाला मागं टाकेल असं वाटत होतं. मात्र, यश दयाळनं अखेरची ओव्हर टाकली ती अद्भूत होती. 


फाफ डु प्लेसिसनं खेळपट्टी कठीण होती, असं म्हटलं. टेस्ट मॅचच्या पाचव्या दिवसाची ही खेळपट्टी असल्यासारखं वाटतं, असं तो म्हणाला. फाफ डु प्लेसिनं त्यांचं मॅच ऑफ द प्लेअर पुरस्कार यश दयाळला समर्पित केलं. 


सर्वात अवघड खेळपट्टी


फाफ डु प्लेसिसनं मॅच प्रेझेंटेशन कार्यक्रमात काय  अद्भूत रात्र होती, अविश्वसनीय आणि एवढं चांगलं वातावरण, होम ग्राऊंडवर विजयासह सीझनच्या समारोपाचा आनंद असल्याचं म्हटलं.  फाफ डु प्लेसिसनं टी-20 मॅचमध्ये आतापर्यंतची सर्वात अवघड खेळपट्टी होती. पावसानंतर परत आल्यानंतर विराट आणि मी 140-150 धावांच्या बाबत चर्चा करत होतो. पंचांनी सांगितलं की खेळपट्टीवर जोरदार पाऊस पडत होता. माघारी आल्यानंतर मिशेल सँटनरला ही खेळपट्टी रांचीमधील पाचव्या दिवसाच्या कसोटीतील असल्यासारखी होती, असं डु प्लेसिस म्हणाला. 


फाफ डु प्लेसिसनं गेल्या सहा मॅचमधील कामगिरीबाबत फलंदाजांचं कौतुक केलं. एम एस धोनी क्रीजवर होता, त्यानं अनेकदा मॅच जिंकवल्या होत्या.मात्र, आमच्या गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली, असं डु प्लेसिस म्हणाला. 


फाफ डु प्लेसिसनं मॅन ऑफ द मॅच यश दयाळला समर्पित करतो, असं म्हटलं. यशनं ज्या प्रकारे बॉलिंग केली ते अविश्वसनीय होतं. त्यामुळं तो दावेदार होता, असं फाफ डु प्लेसिसनं म्हटलं.  प्ले ऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर फाफ डु प्लेसिसनं बंगळुरुच्या प्रेक्षकांचे देखील आभार मानले. आम्ही पराभूत होतो तरी लोक मॅच पाहायला येत होते. त्यामुळं कामगिरीत सुधारणा केली पाहिजे, असं वाटत होतं असं फाफ डु प्लेसिस म्हणाला. 


संबंधित बातम्या :



RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ