IPL Fan Girl : जसंजसं आयपीएल पुढे सरकतेय, तसंतसं चाहत्यांमध्ये क्रेझ वाढत आहे. 2008 पासून आयपीएलला चाहत्यांकडून सपोर्ट मिळत आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची ओळख आहे. चौकार, षठकार, आपला आवडता खेळाडू अन् कल्ला... असा सगळा माहोल स्टेडियममध्ये असतो. त्यासाठी चाहते काहीही करायला तयार होता. आयपीएल पाहण्यासाठी कधी कुणी काही कारणं सांगून घरातून, कार्यालयातून निघेल याचा नेम नाही. पण कधीकधी हे भांड उघड पडतं. आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्यादरम्याचा असाच एक किस्सा सध्या गाजतोय. एका चाहतीने कौटुंबिक कारण सांगून कार्यालयातून सुट्टी घेत थेट स्टेडियमवर पोहचली. पण लाईव्ह कॅमेऱ्यात तिला कॅच केले गेले. त्याचवेळी बॉसही सामना घरातून पाहत होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आयपीएल सामना पाहण्यासाठी काहीजण स्टेडियमवर जातात, तर काही मोबाईल अथवा टिव्हीवर आनंद घेणेचं पसंत करतात. अनेक चाहते तिकीट खरेदी करून स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेतात. काहीजण घरी खोटे बोलून मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतात, तर अनेक जण ऑफिसमध्ये बॉसशी खोटं बोलून मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातात. एका मुलीनेही असेच केले, जेव्हा तिने बॉसशी खोटे बोलून सुट्टी घेतली, अन् स्टेडियममध्ये मॅच पाहायला आली. पण लाईव्ह टिव्हीनं तिचं भांड फोडलं.
बॉसने खोटं पकडलं -
आरसीबीची महिला चाहती नेहा द्विवेदी हिच्यासोबतचा प्रसंग सध्या चर्चेत आहे. नेहाने तिच्या बॉसशी खोटं बोलून ऑफिसमधून सुट्टी घेतली. लवकर सुट्टी घेऊन मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये नेहा गेली होती. पण नेहाच्या बॉसने टीव्हीवर पाहिल्यावर खोटारडेपणा समोर आला. नेहा द्विवेदीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करून संपूर्ण घटना सांगितली. नेहाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मोये-मोये दिवसेंदिवस खरं समोर येत आहे.' नेहा म्हणाली की मॅच बघत असताना बॉसने टीव्हीवर पाहिले आणि मेसेज करून चौकशी केली. बॉस कूल होता, त्यामुळे खोटं बोलूनही काही त्रास झाला नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स -
नेहा द्विवेदीनं पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक, कमेंट्सचा वर्षाव होतोय. नेटकरी आपलं मत व्यक्त केले जात आहे. एका युजर्सने म्हटले की, "स्टेडियममधील प्रत्येक दुसरा व्यक्ती कॅमेरा फोकस करण्याचा प्रयत्न करतो पण संधी मिळत नाही... आता तुमच्याकडे येत आहे." अन्य एका युजर्सने म्हटले की, "ऑफिस का कलेश आने वाला है, ई साला जॉब कप नामदी लोल." तर आणखी एका व्यक्तीने तुला ऑफिसमधून काढून टाकायला हवं, कारण आधी ऑफिसमध्ये खोटे बोललात आणि नंतर तुमचे खासगी कार्यालयातील संभाषण शेअर केलं.