MS Dhoni : कोलकात्याचा पराभव करत चेन्नईची (CSK) गाडी पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर परतली. कोलकात्यानं दिलेले 138 धावांचे आव्हान चेन्नईने (CSK vs KKR) सात विकेट राखून सहज पार केले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड यानं अर्धशतकी खेळी केली. पण चर्चा झाली ती एमएस धोनीचीच... एमएस धोनीला चाहत्यांकडून नेहमीच प्रेम मिळतं. धोनीच्या एका झलकसाठी चाहते स्टेडियममध्ये गर्दी करतात. एमएसच्या एन्ट्रीने सगळं स्टेडियम गरजलं जातं. फक्त धोनी धोनी असा जयघोष ऐकायला मिळतो. चेन्नईमध्ये कोलकात्याविरोधात सोमवारी झालेल्या सामन्यातही तसेच चित्र पाहायला मिळालं. धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला फक्त तीन धावांची गरज होती, त्यावेळी धोनीनं मैदानात पाऊल ठेवलं. धोनीला पाहताच चाहत्यांचा आवाज वाढला. धोनी धोनी असा जयघोष सुरु झाला. हा आवाज इतका मोठा होता, की आंद्रे रसेल याला कानठळ्या बसल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एमएस धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारवार उरला नाही. सगळ्या स्टेडियममध्ये धोनी धोनी असा जयघोष सुरु झाला. चाहत्यांचा आवाज 125 डेसिबल इतका मोठा होता. या आवाजामुळे फिल्डिंग कऱणाऱ्या खेळाडूंनाही काही ऐकू येत नव्हतं. आंद्रे रसेल याच्या तर कानठळ्याच बसल्या. धोनी धोनी घोषणा ऐकून रसेलनं दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धोनी फलंदाजी करताना चाहत्यांनी जयघोष सुरु केला. त्यामुळे रसेल याला काहीही ऐकू येत नव्हतं. त्यानं चक्क कानावर हात ठेवला. रसेल याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ -
धोनीच्या आवाजाने स्टेडियम गरजलं होतं. रसेलने आपले दोन्ही कान हाताने झाकलेच. पण श्रेयस अय्यरची प्रतिक्रियाही चर्चेत आहे. सामन्यानंतर श्रेयस अय्यर याला प्रतिक्रिया देण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळी अय्यर म्हणाला की, स्टेडियममधील हा आवाज बहिरं करणारा आहे, पण मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नईची गाडी विजयाच्या पटरीवर परतली -
कोलकात्याचा पराभव करत चेन्नईची गाडी विजयाच्या पटरीवर परतली आहे. दुसरीकडे यंदाच्या हंगामात कोलकात्याचा पहिला पराभव झाला. कोलकात्यानं प्रथम फंलदाजी करताना 137 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कोलकात्यानं दिलेले हे आव्हान चेन्नईने सहज पार केले. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं नाबाद अर्धशतक ठोकलं. धोनीने तीन चेंडूमध्ये एक धाव काढली.