कोलकाता: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात आयपीएलमधील 36 वी लढत होत आहे. आरसीबीचा कॅप्टन पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये सुरुवातीला कोलकताच्या फिल सॉल्टनं  वादळी खेळी केल्यानंतर आरसीबीनं कमबॅक केलं. आरसीबीच्या मोहम्मद सिराज आणि यश दयालनं कोलकाताला धक्के दिले. फिल सॉल्ट 48 धावा करुन बाद झाल्यानंतर बॅटिंगला आलेला अंगकृष रघुवंशी मोठी धावसंख्या करु शकला नाही. यश दयालच्या बॉलिंगवर कॅमरुन ग्रीननं अविश्वसनीय कॅच घेतला. या कॅचनंतर विराट कोहलीनं ग्रीनला मिठी मारली. 


कॅमरुन ग्रीनचा अविश्वसनीय कॅच


यश दयाळच्या बॉलिंगवर सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अंगकृष रघुवंशीनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे 8.1 फुट ऊंचीवरुन जाणारा बॉल कॅमरुन ग्रीननं हवेत उडी मारुन झेलला. रघुवंशीला यामुळं केवळ 3 धावा करुन माघारी जावं लागलं. कॅमरुन ग्रीन घेतलेल्या कॅचनंतर आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं.  






विराट कोहलीचं सेलिब्रेशन


कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच ईडन गार्डन्सवर होत आहे. विराट कोहली आज एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाला. कोलकाताच्या प्रत्येक विकेटनंतर विराट कोहलीनं जोरदार सेलिब्रेशन केलं. विराट कोहलीनं अंगकृष रघुवंशीचा कॅच घेणाऱ्या कॅमरुन ग्रीनला धावत जाऊन मिठी मारली. त्यापूर्वी विराटनं फिल सॉल्ट बाद झाला होता त्यावेळी देखील सेलिब्रेशन केलं होतं होतं. तर, सुनील नरेनचा कॅच स्वत: विराट कोहलीनंच घेतला होता.  


कोलकाता नाईट रायडर्सचे इतर फलंदाज अपयशी  


फिल सॉल्टच्या आक्रमक खेळीवेळी कोलकाता नाईट रायडर्स मोठी धावसंख्या उभारेल अशी शक्यता होती. फिल सॉल्टला मोहम्मद सिराजनं बाद केलं. फिल सॉल्टनं 48 धावांची खेळी केली. यानंतर कोलकाताचे फलंदाज मोठी खेळी करु शकले नाहीत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या सुनील नरेनला आज मोठी धावसंख्या करता आली नाही. सुनील नरेन 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर अंगकृष रघुवंशी देखील केवळ 3 धावा करुन बाद झाला. व्यंकटेश अय्यरनं 16 धावा केल्या तर रिंकू सिंगला देखील आज मोठी खेळी करण्यात अपयश आलं त्यानं 24 धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाळ, कॅमरुन ग्रीननं कोलकाताच्या फलंदाजीला ब्रेक लावला. 


संबंधित बातम्या :


 IPL 2024, Phil Salt : फिल सॉल्टचं वादळ, मॅक्गर्क- ट्रेडचा विक्रम तुटता तुटता राहिला, एका बॉलनं केला घात, विराट कोहलीचं सेलिब्रेशन चर्चेत


 IPL 2024 : चाहत्यांमुळंचं हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...