RCB vs CSK : चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्याकडे धोनी-विराट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. आरसीबीने दुसऱ्या टप्प्यात शानदार कमबॅक केलेय. लागोपाठ पाच सामने जिंकत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना आता चेन्नईविरोधात भिडायचं आहे. हा सामना आरसीबीसाठी करो या मरो असाच असेल. 


आरसीबीसाठी यंदाचा हंगाम सरासरीच राहिलाय. त्यांना 13 सामन्यात सहा विजय मिळवता आलेत. 12 गुणांसह आरसीबी सहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला चेन्नईचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे. चेन्नईचा संघ 13 सामन्यात 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.


पिच रिपोर्ट काय सांगतो ?


एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादने याच मैदानावर 287 धावांचा डोंगर उभारला होता.  RCB vs CSK सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दव पडण्याची शक्यता असल्यामुळे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा होतो. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे.  


आयपीएल 2024 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमचे आकडे -


 चिन्नास्वामी स्टेडियम आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. यामध्ये तीन वेळा प्रथण तर तीन वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झालाय. आरसीबीने घरच्या मैदानावर आता लोगापाठ दोन सामने जिंकलेत, आता तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. दुसरीकडे चेन्नईने चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलमध्ये 11 सामने खेळले आहेत, त्यामधील सहा सामन्यात विजय मिळवलाय.  


CSK आणि RCB हेड टू हेड


आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये आतापर्यंत 32 वेळा आमनासामना झालाय. यामध्ये चेन्नईचं पारडं जड दिसतेय. चेन्नईने 21 वेळा आरसीबीचा पराभव केलाय. तर आरसीबीला 10 वेळा विजय मिळालाय.  


 RCB vs CSK कुठे पाहाल सामना ?


टिव्हीवर सामना पाहणाऱ्यांना स्टार स्पोर्ट्स चॅनल ट्यून इन करावा लागेल. मोबाईल अथवा टॅबलेटवर  जिओ सिनेमा अॅपवर सामना पाहता येईल. त्याशिवाय जिओ सिनेमाच्या संकेतस्थळावरही सामना पाहता येईल.  


RCB vs CSK दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11 कशी असेल ?


RCB ची संभाव्य प्लेइंग XI : विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मैक्सवेल, कैमरन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, स्वप्निल सिंह


CSK ची संभाव्य प्लेइंग XI: रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड़ (कप्तान), डेरिल मिचेल, शिवम दुबे, समीर रिज़वी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सैंटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंह