जयपूर :आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात मॅच  सुरु आहे.  राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत सातपैकी सहा मॅचमध्ये 12 गुण मिळवत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं सात पैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवला असून ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू  युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयपीएलमध्ये 200 विकेटचा टप्पा पार केला आहे. मुंबईचा फलंदाज मोहम्मद नबीला बाद करत चहलनं ही ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद नबीनं मारलेल्या बॉलचा कॅच युजवेंद्र चहलनं 200 वी विकेट घेतली. युजवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासात 200 विकेटचा टप्पा गाठणारा पहिला बॉलर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलनं 13 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्य स्थानावर आहे. 


युजवेंद्र चहल हा सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट काढणारा खेळाडू ठरलाय. चहलनं यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं 13 विकेट घेतलेल्या आहेत. युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये 153 मॅचमध्ये 200 विकेट घेतल्या आहेत. चहलची सरासरी 21.38  इतकी असून 7.70  इतकी इकोनॉमी आहे. युजवेंद्र चहलनं आयपीएलमध्ये  40 धावांवर  5 विकेट ही सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. 


चहलचं सेलिब्रेशन






युजवेंद्र चहलनं 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. चहलच्या नावावर आयपीएलमध्ये आता 200 विकेट आहेत. आयपीएलमध्ये विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो आहे. ब्राव्होनं  161 मॅचमध्ये 183 विकेट घेतलेल्या आहेत.  ब्राव्होनं आयपीएलमधून निवृत्ती घेतेली आहे. 
 
मुंबई इंडियन्सचा बॉलर पियूष चावला या मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. पियूष चावलानं  186  मॅचमध्ये 181 विकेट घेतल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमार चौथ्या स्थानावर असून त्यानं 174 विकेट घेतलेल्या आहेत. अमित मिश्रानं 173 विकेट घेतलेल्या आहेत. रविचंद्रन अश्विन आणि सुनील नरेननं 172, लासिथ मलिंगा 170 , जसप्रीत बुमराहनं 158,  रवींद्र जडेजानं 156 विकेट घेतल्या आहेत. यानंतर हरभजन सिंह यांचा क्रमांक लागतो. 


युजवेंद्र चहलनं आठ मॅचमध्ये चहलनं 13 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहनं देखील 13 विकेट घेतल्या असून कमी धावा देत ही कामगिरी केल्यानं तो पर्पल कॅपचा मानकरी आहे. 


संबंधित बातम्या :


मुंबईची यंदाच्या आयपीएलमध्ये सत्वपरीक्षा, विजयासाठी संघर्ष, नीता अंबानी साई चरणी लीन

Virat Kohli:विराट कोहलीच्या विकेटचं प्रकरण पेटलं, मोहम्मद कैफ मैदानात उतरला,अम्पायरिंगवर सडकून टीका, हर्षित राणाला माफी मागण्याचा सल्ला