जयपूर : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) दिलेलं 183 धावांचं आव्हान यशस्वीपणे पार केलं आहे. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 विकेटच्या जोरावर 183 धावा केल्या होत्या. विराट कोहलीच्या नाबाद 113 धावा आणि कॅप्टन फाफ डु प्लेसिस याच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीनं राजस्थानपुढं 183 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर आणि कॅप्टन संजू सॅमसन यांच्या खेळीच्या जोरावर धावसंख्येचा पाठलाग केला. कॅप्टन संजू सॅमसननं 69 धावा केल्या. कॅप्टन बाद झाल्यानंतर जोस बटलरनं इतर खेळाडूंच्या साथीनं राजस्थानला विजयाजवळ नेलं. राजस्थान रॉयल्सनं जोस बटलरच्या 4 सिक्स आणि 9 चौकारांच्या जोरावर 58 बॉलमध्ये 100 धावा करत महेंद्रसिंह धोनी स्टाइलनं सिक्स मारुन राजस्थानला विजय मिळवून दिला.
रॉयल चॅलेंजर्स बगंळुरुनं दिलेलं 183 धावांचं आव्हान गाठताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल गोल्ड डकवर बाद झाला. यानंतर राजस्थानचा डाव कॅप्टन संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी सावरला. जोस बटलरनं धावा केल्या तर संजू सॅमसननं 69 धावा केल्या. संजू सॅमसनची कर्णधारपदाला साजेशी खेळी, जोस बटलरला सूर गवसला
राजस्थान रॉयल्सच्या संघासमोर सलामीवीरांच्या कामगिरीचा प्रश्न होता. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर या पूर्वीच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करु शकले नव्हते. आज देखील यशस्वी जयस्वाल शुन्यावर बाद झाला. तर, महत्त्वाच्या मॅचमध्ये जोस बटलर फॉर्ममध्ये परतला. दुसरीकडे कॅप्टन संजू सॅमसननं कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 69 धावांची खेळी केली. संजू सॅमसननं 42 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 चौकारांसह 69 धावाकेल्या.
राजस्थान रॉयल्सनं आजची मॅच जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. राजस्थाननं सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवत 8 गुणासंह पहिलं स्थान पटकावलं आहे.
विराटचं शतक आरसीबीच्या 3 विकेटवर 183 धावा
राजस्थाननं प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर रॉयल चलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं डावाची सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं यंदाच्या आयपीएलमधील सलामीच्या भागिदारीचं रेकॉर्ड मोडलं. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं आरसीबीला 125 धावांची भागिदारी करुन दिली. फाफ डु प्लेसिस 44 धावा करुन बाद झाला. यानंतर आरसीबीचा डाव विराट कोहलीनं पुढं नेला. विराट कोहलीनं 72 बॉलमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 113 धावा केल्या. विराटच्या खेळीच्या आधारे आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 3 विकेटवर 183 धावा केल्या.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद कोण मिळवणार? माजी क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, म्हणाला...