IPL 2024, Points Table : वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. रियान परागच्या शानदार खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने पराभवाची हॅट्रिक केली आहे. गुजरात, हैदराबाद आणि आता राजस्थान संघाने मुंबईचा पराभव केला. सलग तीन पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी पोहचला आहे. तर राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. राजस्थानने सलग तीन विजयाची नोंद करत सहा गुणांची कमाई केली आहे.  राजस्थान आणि कोलकाता या संघाचा नेट रनरेटही शानदार आहे. या दोन्ही संघाचा रनरेट +1 पेक्षा जास्त आहे. तर मुंबई आणि आरसीबीचा रनरेट सर्वात खराब आहे. मंगळवारी आरसीबीचा संघ आपला रनरेट सुधारण्याचा प्रयत्न करेल. 

मुंबईचा संघ तळाशी - 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. तर दुसरीकडे कोलकाता आणि राजस्थान संघाला अद्याप एकाही पराभवाचा सामना करावा लागला नाही.  राजस्थानचा संघ गुणातलिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

गुणतालिकेत कोण कोणत्या क्रमांकावर ?

संजू सॅमसनचा राजस्थान संघ सहा गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकात्याच्या नावावर चार गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई, गुजरात यांच्याही नावावर प्रत्येकी चार चार गुण आहेत, ते अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि चेन्नई यांचा प्रत्येकी एक पराभव झाला आहे. 

सनरायजर्स हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौ, दिल्ली, पंजाब आणि आरसीबी यांच्या नावावर प्रत्येकी दोन दोन गुण आहेत. आरसीबी नवव्या क्रमांकवर विराजमान आहे. तर हैदराबाद पाचव्या स्थानी आहे. लखनौ सहाव्या, दिल्ली सातव्या आणि पंजाबचा संघ आठव्या क्रमांकावर आहे.

आयपीएल गुणतालिका

No. संघाचे नाव सामने विजय टाय पराभव गुण नेट-रनरेट
1.
 राजस्थान रॉयल्स RR
3 3 0 0 6 1.249
2.
कोलकाता नाइट रायडर्स KKR
2 2 0 0 4 1.047
3. चेन्नई सुपर किंग्स CSK 3 2 0 1 4 0.976
4.
गुजरात टायटन्स GT
3 2 0 1 4 -0.738
5.
सनरायजर्स हैदराबाद SRH
3 1 0 2 2 0.204
6.
लखनौ सुपर जायंट्स LSG
2 1 0 1 2 0.025
7.
दिल्ली कॅपिटल्स DC
3 1 0 2 2 -0.016
8.
पंजाब किंग्स PBKS
3 1 0 2 2 -0.337
9.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु RCB
3 1 0 2 2 -0.711
10.
मुंबई इंडियन्स MI
3 0 0 3 0 -1.423

आणखी वाचा :

मुंबईचा सलग तिसरा पराभव, राजस्थानने 6 विकेटने दिली मात, रियान परागचं झंझावाती अर्धशतक