FACT CHECK Hardik Pandya STEPS Down As Mumbai Indians Captain : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडेलला नाही. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याशिवाय घरच्या मैदानावर राजस्थानविरोधात मुंबईची अवस्था अतिशय दैयनीय झाली आहे. गुजरात आणि हैदराबाद यांच्याविरोधातील पराभवानंतर हार्दिक पांड्यानं मुंबईचं कर्णधारपद सोडलं. आता संघाची धुरा रोहित शर्माकडे असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याच व्हायरल होणाऱ्या मेसेजचं सत्य तपासणार आहेत.. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्या याच्याकडेच आहे. वानखेडेवर राजस्थानविरोधात तो मुंबईचं नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्स अथवा आयपीएलकडून हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडल्याची कोणताही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार झाल्याच्या बातम्यात कोणतेही तथ्य नाही. 



सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही मसेज पाहा...























आज एक एप्रिल आहे, एप्रिल फूल दिवस असल्यामुळे काही क्रीडा प्रेमी रोहित शर्मा मुंबईचा पुन्हा कर्णधार झाल्याच्या खोट्या अफवा पसरवत असल्याचं दिसतेय. 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर पियुष चावलाचं स्टेटमेंट -


मुंबईच्या कर्णधारपदावर फिरकी गोलंदाज पियूष चावला यानेही आपलं मत नोंदवलेय. त्यानं हार्दिक पांड्याला होत असलेल्या ट्रोलिंगवरही मत व्यक्त केलेय. स्टेडियममध्ये होत असलेल्या हूटिंगचा हार्दिक पांड्यावर फरक पडत नसल्याचे पियूष चावलाने सांगितले. पियूष चावला म्हणाला की, "प्रत्येकाचं नेतृत्व वेगळं आहे. रोहित शर्माकडे नेतृत्व करण्याची कला वेगळी आहे, हार्दिक पांड्याकडे वेगळी कला आहे. हार्दिक पांड्या यानं गुजरातचं यशस्वी कर्णधारपद सांभाळल्याचं आपल्याला माहिती आहे. हार्दिक पांड्याने गुजरातला दोन वेळा फायनलमध्ये नेलं होतं. त्यामध्ये एक वेळा चषकावर नाव कोरलं आहे."