IPL 2024 Playoffs chances: ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या हंगामाचा शेवट गोड केला. दिल्लीनं लखनौचा 19 धावांनी पराभव केला. दिल्लीकडून पराभव झाल्यामुळे लखनौच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या इच्छेला सुरुंग लागला आहे. आता लखनौला अखेरचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे. पण त्यांचा रनरेट खराब असल्यामुळे लखनौचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात येऊ शकतं. दिल्लीने लखनौचा पराभव केल्याचा फायदा संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला झाला आहे. संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्स यंदाच्या हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरलेय. 


राजस्थानला फायदा - 


लखनौच्या पराभवाचा फायदा राजस्थानला झालाय. राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. प्लेऑफसाठी पात्र होणारा राजस्थानचा दुसरा संघ ठरलाय. याआधी कोलकाता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता.


दिल्लीचं प्लेऑफमधील आव्हान संपलं ? Delhi Capitals Playoffs Scenario


ऋषभ पंतच्या दिल्लीनं आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवला. पण त्यांचं प्लेऑफमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं. दिल्लीनं 14 सामन्यात 14 गुणांची कमाई केली आहे. पण त्यांचा रनरेट अतिशय खराब आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचणं कठीण दिसतेय. दिल्लीचा रनरेट -  0.377 इतका आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अखेरच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय गरजेचा होता. पण दिल्लीला फक्त 19 धावांनी विजय मिळाला.


लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपल्यात जमा Lucknow Super Giants Playoffs Scenario


केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफचं आव्हान अतिशय खडतर झालेय. लखनौकडे 13 सामन्यात 12 गुण आहेत. त्यांचा रनरेटही - 0.787 इतका खराब आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकला तरी प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता खराबच आहे. ऋषभ पंतच्या दिल्लीने लखनौची पार्टी खराब केली. लखनौचा आता अखेरचा सामना मुंबई इंडियन्सविरोधात आहे. मुंबईचं स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. 17 मे रोजी लखनौ आणि मुंबई यांच्यातील सामना होणार आहे.


दोन जागा, तीन संघामध्ये चुरस - 


मुंबई, गुजरात आणि पंजाब यांचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. लखनौ आणि दिल्ली यांचेही आव्हान आता जवळपास संपल्यात जमा आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. आता उर्वरित दोन जागांसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. हैदराबादचे दोन सामने शिल्लक आहेत. गुजरात आणि पंजाबविरोधात हैदराबादला खेळायचं आहे. हे दोन्ही संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. हैदराबादचा दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास प्लेऑफचं समीकऱण अधिक रोमांचक होऊ शकतं. 






चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुमध्ये त्यांचा सामना होणार आहे. चेन्नईने आरसीबीचा पराभव केला, तर ते थेट पात्र ठरणार आहेत. पण आरसीबीचा संघ मात्र समिकरणात अडकलाय. 


चेन्नईचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे आरसीबीला मोठ्या फरकाने विजय नोंदवावा लागेल. जर प्रथम फलंदाजी केली तर आरसीबीला 18 धावांनी सामना जिंकावा लागेल. धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 18.1 षटकात आव्हान पार करावे लागेल. हैदराबाद आणि लखनौच्या सामन्यावरही आरसीबीचं प्लेऑफचं गणित अवलंबून आहे.