DC vs LSG Score Live Updates : अभिषेक पोरेलचा झंझावात आणि स्ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 208 धावांचा डोंगर उभारला. अभिषेक पोरेल यानं 58 तर स्टब्सने 57 धाांची खेळी केली. शाय होप 38 तर पंतने 33 धावांचं योगदान दिलं. लखनौकडून नवीन उल हक यानं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लखनौला विजयासाठी 209 धावांचं आव्हान मिळालेय.


दिल्लीची खराब सुरुवात


लखनौचा कर्णधार केएल राहुल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अर्शद खान यानं कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरला. अर्शद खान यानं पहिल्याच षटकात धोकादायक जेक मॅकगर्क याला तंबूचा रस्ता दाखवला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या मॅकगर्क याला तंबूत पाठवत मोठा अडथळा दूर केला. पण अभिषेक पोरेल यानं मॅकगर्क याची कमी जाणवू दिली नाही. 


अभिषेक पोरेलनं डाव सावरला -


पहिल्याच षटकात जेक मॅकगर्क बाद झाल्यानंतर युवा अभिषेक पोरेल यानं सामन्याची सुत्रे हातात घेतली. अभिषेक पोरेल यानं चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. पोरेल यानं लखनौच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पोरेल याला शाय होप यानं चांगली साथ दिली. शाय होप आणि अभिषेक पोरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागिदारी केली.   शाय होप यानं 27 चेंडूत 38 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये होप यानं दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. अभिषेक पोरेल याने 176 धावांच्या स्ट्राईक रेटनं पिटाई केली. पोरेल याने 33 चेंडूमध्ये 58 धावांचा पाऊस पाडला. पोरेल यानं आपल्या वादळी खेळीमध्ये चार षटकार आणि पाच खणखणीत चौकार ठोकले. 




ट्रिस्टन स्टब्सचा फिनिशिंग टच - 


शाय होप बाद झाल्यानंतर अभिषेक पोरेलच्या साथीला ऋषभ पंत आला. पण अभिषेक पोरेल याचा अडथळा नवीन उल हक यानं दूर केला. त्यानंतर पंतने आणि स्ट्रिस्टन स्टब्सच्या साथीने डावाला आकार दिला. ऋषभ पंत यानं 23 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 33 धावांचा पाऊस पाडला.  पंत तंबूत परतल्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने सामन्याची सुत्रे हातात घेतली. स्टब्सने अखेरच्या षटकार वादळी फलंदाजी करत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. स्टब्सला अक्षर पटेलनं चांगली साथ दिली. अक्षर पटेलने 10 चेंडूत दोन चौकरांच्या मदतीने 14 धावांची खेळी केली. स्ट्रिस्टन स्टब्स यानं फिनिशिंग टच दिला. त्याने 228 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. स्टब्सने 25 चेंडूमध्ये चार चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने 57 धावांचा पाऊस पाडला. 




लखनौची गोलंदाजी कशी राहिली ?


केएल राहुल यानं दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी सात गोलंदाजांचा वापर केला. पण यश मिळाले नाही. लखनौकडून नवीन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, पण त्याला धावा रोखता आल्या नाहीत. त्यानं चार षटकात 51 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या. अर्शद खान आणि रवि बिश्नोई यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. मोहसिन खान, युद्धवीर सिंह, कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डा यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.