IPL 2024 MI vs SRH: आज मुंबई इंडियन्स अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना
IPL 2024 MI vs SRH: गुणतालिकेत मुंबईचा संघ संध्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 7 विकेटने पराभव केला.
सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत शतक केले पूर्ण
174 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. रोहित शर्मा, नमन धीर आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले. इशान 9, रोहित चार आणि नमन शून्यावर तंबूत परतले.
सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबई सामन्यात वरचढ ठऱत आहे.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं शानदार फलंदाज केली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर कमिन्स यानं हैदराबादी धावसंख्या वाढवली. कमिन्स यानं अखेरीस 205 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. कमिन्सने दोन षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 17 चेंडूत 35 धावा केल्या. कमिन्सच्या शानदार खेळीच्या बळावर हैदराबादचा संघ 173 धावांपर्यंत मजल मारु शकला. सनवीर सिंह यानं आठ धावा करत कमिन्सला चांगली साथ दिली.
हार्दिक पांड्या आणि पियुष चावला यांनी आज भेदक मारा केला. पांड्यानं 4 षटकात 31 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर पियुष चावला यानं 33 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. चावलाने क्लासेन, हेड आणि समद यांना तंबूत पाठवले. तर हार्दिक पांड्याने नितीश रेड्डी, अब्दुल समद आणि मार्को यान्सन यांना बाद केले. जसप्रीत बुमराहने 23 धावांच्या मोबदल्या एक विकेट घेतली. तर अंशुड कंबोज यानेही एक विकेट घेतली. नुवान तुषारा याला विकेट घेण्यात अपय़श आले.
मुंबई इंडियन्ससमोर 174 धावांचे आव्हान.. हैदराबाद 173 धावांपर्यंत मजल
अब्दुल समद याला बाद करत चावलाने हैदराबादला दिला आठवा धक्का... हैदराबाद 8 बाद 136 धावा. ..
हार्दिक पांड्यानं हैदराबादला दिला सातवा धक्का.. मार्को यान्सन तंबूत
शाहबाज अहमद बाद.. हैदराबादला सहावा धक्का...
पियूष चावलाने ट्रेविस हेडच्या दांड्या उडवल्या... मुंबईला पाचवं यश
हार्दिक पांड्याने रेड्डीला केले बाद.. मुंबईला चौथा धक्का बसलाय.
ट्रेविस हेडचं अर्धशतक 2 धावांनी हुकलं. 48 धावांवर पियुष चावलानं केले बाद
कंबोजनं हैदराबादला दिला दुसरा धक्का... मयांक अग्रवाल स्वस्तात तंबूत परतला.
जसप्रीत बुमराहने दिला हैदराबादला पहिला धक्का... अभिषेक शर्मा बाद झाला..
हेड आणि अभिषेक शर्मानं शानदार सुरुवात केली. हैदराबाद 4.4 षटकानंतर बिनबाद 41 धावा
अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज़ अहमद, मार्को जानेसन, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेविड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर - नेहाल वढेरा, सॅम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमारिओ शेफर्ड
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वानखेडेचं मैदाना छोटं असल्यामुळे सहज धावा होतात. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यास कोणत्याही संघाला फायदेशीर ठरतं. कारण सायंकाळी दव पडण्याची शक्यता असते. कमीत कमी 180 ते 200 धावा होऊ शकतात.
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेन्रीच क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, जेन्सन, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग
रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.
पार्श्वभूमी
IPL 2024 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: आज मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. गुणतालिकेत मुंबईचा संघ संध्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -