Prakash Abedkar On Parbhani Violance: परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. यावर त्यांनी ट्वीट केलं आहे.
परभणी बंदला हिंसक वळण
परभणीतील संविधानपुस्तिकेच्या विटंबनेनंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती.या हाकेला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी बंद दुकानावर दगडफेक केली आहे. तसेच पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आलीय काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली. यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आलंय. पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं असून शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, परभणीतील या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला असून येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच दिलाय.
आंदोलकांनी पाईप पेटवले, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबण्याच्या प्रकरणात आज परभणी बंद करण्यात आले होते या बंदला हिंसक वळण लागले.आंदोलन करत असलेल्या काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलीये पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आता परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आला असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आलीय. काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन मोडवर आल्याचा दिसून येते पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.