IPL 2024 Marathi News KKR vs PBKS: पंजाब किंग्सने (PBKS) चौकार-षटकारांचा वर्षाव झालेल्या सामन्यात विश्वविक्रमी विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 8 गड्यांनी बाद 261 धावा पराभव केला. कोलकाताने 20 षटकांत 6 उभारल्यानंतर पंजाबने 18.4 षटकांत 2 बाद 262 धावा केल्या. यासह पंजाबने टी-20 इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
पंजाब आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएल आणि टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारले गेले. इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब आणि कोलकाताच्या फलंदाजांनी एकूण 42 षटकार ठोकले. या सामन्यात यापूर्वीचा विक्रम मोडला होता, जो याच मोसमात हैदराबाद आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात बनला होता. मुंबई-हैदराबाद सामन्यात एकूण 38 षटकार लगावले होते.
पंजाब आणि कोलकाताच्या सामन्यात कोणते विक्रम झाले?
- 1. पंजाब आणि कोलकाताच्या या सामन्यात दोन्ही संघाचे मिळून 524 धावा झाल्या.
- 2. दोन्ही डावात एकूण 42 षटकार
- 3. 45 चेंडूत शतक (जॉनी बेअरस्टो)
- 4. 18, 23, 23, 23, 25 चेंडूत खेळाडूंनी झळकावले अर्धशतक
- 5. एका डावात सर्वाधिक षटकार
- 6. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा पाठलाग
पुरुषांच्या टी 20 सामन्यात सर्वाधिक षटकार
42 षटकार - KKR विरुद्ध PBKS, कोलकाता, IPL 2024
38 षटकार - SRH vs MI, हैदराबाद, IPL 2024
38 षटकार - RCB vs SRH, बंगळुरू, IPL 2024
37 षटकार - बल्ख लिजेंड्स विरुद्ध काबुल झवानन, शारजाह, एपीएल 2018/19
37 षटकार - SKNP vs JT, Basseterre, CPL 2019.
गुणतालिकेची काय स्थिती?
पंजाबच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL 2024 Latest Points Table) चुरस आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानचा संघ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 8 सामन्यात 7 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 14 गुण आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 8 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद आणि लखनौचा संघही 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर असून चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात आणि पंजाबचा संघ देखील 8 गुणांसह अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या स्थानावर आहे. पंजाबच्या विजयाचा मुंबईला फटका बसला आहे. मुंबईता संघ आठव्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. आरसीबीची देखील हिच अवस्था पाहायला मिळत आहे. आरसीबीचे सध्या 4 गुण आहे. आरसीबीने आतापर्यंत फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या:
दोघांनी धावून एक रन पूर्ण केला, अंपायरने मात्र तो फेटाळला; गौतम गंभीर मैदानाबाहेर भिडला, Video