IPL 2024 All Ten Team's Purse Value : आयपीएल 2024 पूर्वी सर्व दहा संघांनी रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केली. मुंबई, कोलकात्या साराख्या संघाने आपल्या संघातील स्टार खेळाडूंना सोडलेय. आरसीबी आणि चेन्नईनेही मोठ्या खेळाडूंना डच्चू दिलाय. रिलिज आणि रिटेन खेळाडू केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक राहिली, याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
हार्दिक पांड्याला कॅश डीलमध्ये मुंबई इंडियन्सला देणाऱ्या गुजरा संघाकडे सर्वाधिक रक्कम आहे. तर लखनौ सुपर जायंट्स संघाकडे सर्वात कमी रक्कम आहे. हैदराबाद संघाकडे दुसऱ्या क्रमांकाची रक्कम शिल्लक आहे. आरसीबीने अखेरच्या क्षणी कॅमरुन ग्रीन याला ताफ्यात घेतल्यामुळे त्यांच्याकडील रक्कम कमी झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नईनेही अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलाय. पाहूयात, कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे..
लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?
गुजरात टायटन्स - 38.15 कोटी
सनरायजर्स हैदराबाद- 34 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स- 32.7 कोटी
चेन्नई सुपर किंग्स- 31.4 कोटी
दिल्ली कॅपिटल्स- 28.95 कोटी
पंजाब किंग्स- 29.1 कोटी
रॉयल चॅलेंजर्ल बेंगलोर- 23.25 कोटी
मुंबई इंडियन्स- 17.75 कोटी
राजस्थान रॉयल्स- 14.5 कोटी
लखनौ सुपर जायंट्स- 13.15 कोटी.
आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार?
IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल लिलाव भारताऐवजी विदेशात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन 2023 च्या आयपीएलसाठी सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला पंजाब किंग्जने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता या वेळी कोणत्या खेळाडूला सर्वात महागडी बोली लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त फक्त चेन्नई सुपर किंग्जलाच 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे.