IPL 2024 RCB vs GT Virat Kohli Will Jacks: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा 9 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या 70 आणि विल जॅक्सने 100 धावांची खेळी केली. कोहली आणि जॅक्सच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने यंदाच्या हंगामातील तिसरा विजय मिळवला. गुजरातविरुद्धच्या विजयानंतर आरसीबीने या स्पर्धेत आव्हान कायम ठेवलं आहे. बंगळुरूच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण पूर्णपणे बदललेले दिसत होते. आरसीबीने ट्विटर हँडलवरुन काही व्हिडीओही शेअर केले आहेत. 


गुजरातने फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकांत 3 बाद 200 धावा केल्या. परंतु, बंगळुरूने हे आव्हान 16 षटकांमध्येच पार करताना 1 बाद 206 धावा केल्या. नाबाद तडाखेबंद शतक झळकावलेला विल जॅक सामनावीर ठरला. कोहली-जॅक यांनी दुसऱ्या गड्यासाठी 74 चेंडूंत नाबाद 166 धावांची विजयी भागीदारी केली. जॅकने केवळ 41 चेंडूत शतक झळकावत संघाचा विजय साकारला. 4 षटकांत 24 धावांची गरज असताना जॅकने राशिद खानला चार षटकार व एक चौकार मारत सामनाच संपवला. जॅकने आपल्या खेळीत 5 चौकारांसह 10 षटकार लगावले. 


जॅक्सच्या 10 चेंडूत 50 धावा-


14व्या षटकाच्या अखेरीस जॅकने 29 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. पण 15व्या आणि 16व्या षटकातही जॅक्सने गुजरातच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. प्रथम मोहित शर्माने टाकलेल्या 15व्या षटकांत 29 धावा दिल्या, त्यानंतर पुढच्याच षटकात राशिद खाननेही 29 धावा दिल्या. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी 58 धावा केल्या, त्यापैकी 56 धावा जॅक्सने केल्या. ज्यामुळे तो 41 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करू शकला. 


विराट कोहली जॅक्सला काय म्हणाला?


विराट कोहलीचा एक व्हिडीओ देखील आरसीबीने शेअर केला आहे. यामध्ये कोहली म्हणतो की, मी 16 व्या षटाकात्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणार होतो. पण जेव्हा जॅक्सच्या 94 धावा झाल्याचे पाहिले आणि त्यावेळी संघाला देखील विजयासाठी केवळ 1 धाव हवी होती. तेव्हा कोहलीच्या लक्षात आले की त्याने षटकार न मारलेलेच बरे. त्यानंतर जॅक्सने षटकार मारत आपले शतक पूर्ण केले आणि आरसीबीला विजय देखील मिळवून दिला. 






गुजरात टायटन्सची खराब गोलंदाजी


अजमतुल्ला उमरझाई व्यतिरिक्त, गुजरात टायटन्सचा असा एकही गोलंदाज नाही ज्याने 10 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. गुजरातकडून साई किशोरने 3 षटकांत 30 धावा देत एकमेव विकेट घेतली. तर राशिद खानने 4 षटकात 51 धावा देत गोलंदाजीत आपले अर्धशतक पूर्ण केले. मोहित शर्मा आणि नूर अहमद यांनाही आरसीबीच्या फलंदाजांनी धारेवर धरले होते. 


संबंधित बातम्या:


ICC T20 WC 2024: ब्रायन लाराने टी-20 विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ; दोन नावं पाहून क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकीत


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!