Hardik Pandya On Captaincy : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला शानदार कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची हाकलपट्टी करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवली होती. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटचा हा डाव सपशेल अपटला. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. प्लेऑपमध्येही स्थान पटकावता आले नाही. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नेटकऱ्यांनी आणि मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केले. माजी क्रिकेटपटूंनीही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हार्दिक पांड्याने आपल्या नेतृत्वावर वक्तव्य केलेय. त्यासोबत तो कर्णधार म्हणून काय विचार करतो? याबाबतही पांड्यानं मत व्यक्त केले.
माझ्या कर्णधारपदाचा अर्थ म्हणजे... - हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्याने स्टार स्पोर्ट्सवर दिलेल्या मुलाखतीत नेतृत्वावर मोठं वक्तव्य दिलेय. पांड्या म्हणाला की, माझी कॅप्टन्सी अतिशय साधी आहे. माझ्या नेतृत्वाचा अर्थ म्हणजे हार्दिक पांड्या इतर 10 सहकाऱी खेळाडूंसोबत खेळत आहे. हाच माझ्या कर्णधारपदाचा मंत्र आहे. कर्णधार असताना तुम्हाला सहकारी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरावा लागतो. विश्वास दाखवावा लागतो. त्यासोबत खेळाडूंनी मैदानावर 100 टक्के द्यावे अशी सर्वांची अपेक्षा आहे, मी माझ्या खेळाडूंना त्यांचे 100 टक्के द्यावे असे नेहमी सांगतो.
निकालावर माझा फोकस नसतो, पण...
हार्दिक पंड्या म्हणला की, निकालावर माझा फोकस कधीच नसतो. पण मी नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय कर्णधार म्हणून तुम्हाला तुमच्या खेळाडूंकडून 100 टक्के खेळ करुन घ्यावा लागतो.
दरम्यान, गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 जिंकली. यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आयपीएल 2023 मध्ये उपविजेता राहिला. पण या वर्षी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून वाईटरित्या फ्लॉप झाला. त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. आता हार्दिक पांड्याने नेतृत्वावर आपलं मत व्यक्त केलेय.
आणखी वाचा :
हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाले? जय शाह यांनी काय दिल्ले उत्तर